Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळी उठल्यानंतर नियमित करा तुळशीच्या पाण्याचे सेवन, शरीरासह त्वचेला होतील अनेक फायदे

औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या तुळशीच्या पानांचे सेवन केल्यामुळे त्वचेसह आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुम्ही नियमित एक तुळशीचे पान खाऊ शकता. तुळशीच्या पानांचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते, पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तुळशीच्या पानांचे वेगेवेगळ्या पद्धतीने सेवन केले जाते.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 13, 2024 | 08:29 AM
तुळशीच्या पानांचे पाणी पिण्याचे फायदे

तुळशीच्या पानांचे पाणी पिण्याचे फायदे

Follow Us
Close
Follow Us:

मागील अनेक वर्षांपासून तुळशीचा वापर धार्मिक पूजेसाठी आणि इतर कामांसाठी केला जात आहे. तसेच आयुर्वेदामध्ये सुद्धा तुळशीच्या पानांना विशेष महत्व आहे. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या तुळशीच्या पानांचे सेवन केल्यामुळे त्वचेसह आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर तुम्ही नियमित एक तुळशीचे पान खाऊ शकता. तुळशीच्या पानांचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते, पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तुळशीच्या पानांचे वेगेवेगळ्या पद्धतीने सेवन केले जाते. काही लोक तुळशीच्या पानांचा चहा बनवून पितात तर काहींना तुळशीच्या पानांचे पाणी बनवून पितात. हे पाणी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला तुळशीचे पानांचे पाणी कसे बनवावे? तुळशीच्या पानांचे पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य-istock)

तुळशीच्या पानांचे पाणी बनवण्याची कृती:

सर्वप्रथम 7 ते 8 तुळशीची पाने घेऊन स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर टोपात पाणी गरम करायला ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात तुळशीची पाने टाकून काही वेळ उकळण्यासाठी ठेवा. पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. त्यानंतर तुळशीच्या पानांत तुम्ही मध मिक्स करून पिऊ शकता.

हे देखील वाचा: तुटणे, गळणे आणि कोरड्या केसांसाठी घरीच तयार करा भृंगराज तेल

तुळशीच्या पानांचे पाणी पिण्याचे फायदे:

सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो:

सर्दी, खोकला झाल्यानंतर तुळशीचे पाणी प्यायल्यास सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे घशाला आलेली सूज कमी होते. तसेच हे पाणी तुम्ही पित असाल तर तुम्हाला सर्दी किंवा खोकला होणार नाही.

शरीर डिटॉक्स होते:

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी तुळशीची पाने अतिशय प्रभावी आहेत. तुळशीच्या पानांमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच बिघडलेली पचनक्रिया सुधारते.

त्वचेसाठी गुणकारी:

तुळशीच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे चेहऱ्यावर आलेले पिंपल्स नाहीसे होतात. पिंपल्सपासून त्वचेचा बचाव करण्यासाठी नियमित तुळशीच्या पानांचे सेवन करावे किंवा तुळशीचे एक पान चावून खावे.

हे देखील वाचा: ओव्यासोबत नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन, आरोग्याला होतील चमत्कारीत फायदे

मानसिक ताण कमी होतो:

तुळशीच्या पानांचे सेवन केल्यामुळे मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. यामध्ये ॲडाप्टोजेन नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे ताण तणाव कमी होऊन आरोग्य सुधारते. या पाण्याचे नियमित सेवन केल्यास मन शांत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Benefits of drinking tulsi leaves water recipe for making tulsi leaf water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2024 | 08:29 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Healthy Drinks

संबंधित बातम्या

Foods For Constipation: आतड्यांमध्ये चिकटलेली घाण क्षणार्धात होईल स्वच्छ! पोट साफ होण्यासाठी दुधात मिक्स करून प्या ‘हे’ पदार्थ
1

Foods For Constipation: आतड्यांमध्ये चिकटलेली घाण क्षणार्धात होईल स्वच्छ! पोट साफ होण्यासाठी दुधात मिक्स करून प्या ‘हे’ पदार्थ

हृद्य आणि मन निरोगी ठेवण्यासाठी नियमित खा एक पाकळी लसूण, शारीरिक समस्यांपासून मिळेल सुटका
2

हृद्य आणि मन निरोगी ठेवण्यासाठी नियमित खा एक पाकळी लसूण, शारीरिक समस्यांपासून मिळेल सुटका

उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास शरीराला होतील जादुई फायदे, वाढलेले वजन होईल झपाट्याने कमी
3

उपाशी पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून प्यायल्यास शरीराला होतील जादुई फायदे, वाढलेले वजन होईल झपाट्याने कमी

वेळीच थांबवा प्री-डायबिटीस, उत्तम पोषण थांबवू शकतो डायबिटीस वेळीच करा सुरू
4

वेळीच थांबवा प्री-डायबिटीस, उत्तम पोषण थांबवू शकतो डायबिटीस वेळीच करा सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.