ओव्यासोबत करा 'या' पदार्थांचे सेवन
आयुर्वेदात ओव्याला विशेष महत्व आहे. ओवा खाल्यामुळे पोटासंबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. त्यामुळे रात्रीच्या वेळी किंवा इतर वेळी पोटात दुखू लागल्यास ओवा खाण्यास दिला जातो. ओवा खाल्यामुळे पोट स्वच्छ होण्यास मदत होते. पोटासंबंधित समस्या जाणवू लागल्यानंतर अनेकदा ओवा खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे पोटात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर पडून जाण्यास मदत होते. चवीला तिखट असलेला ओवा अनेकांना आवडत नाही. पण ओवा अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि पोटावरील चरबी वितळवण्यासाठी ओव्याचे पाणी प्यावे. या पाण्यात असलेल्या गुणधर्मांमुळे सर्व समस्या दूर होतात. आज आम्ही तुम्हाला ओव्यासोबत इतर कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ खाल्यामुळे आरोग्याला चमत्कारीत फायदे होतील.(फोटो सौजन्य-istock)
अर्धा वाटी ओवा आणि अर्धा वाटी बडीशेप मिक्स करून तुम्ही नियमित एक चमचा हे मिश्रण खाल्यास पोटासंबंधित समस्या उद्भवणार नाहीत. पोट स्वच्छ होण्यास मदत होईल. तसेच बडीशेप खाल्यामुळे तोंडातील दुर्गंधी निघून जाईल. ओवा बडीशेपचा वापर तुम्ही माऊथ फ्रेशनर म्हणून सुद्धा करू शकता. ऑइली किंवा हेवी फूडचे सेवन केल्यानंतर कोमट पाण्यात किंवा साध्य पाण्यात ओवा बडीशेप मिक्स करून तुम्ही खाऊ शकता. यामुळे पचनासंबंधित समस्या उद्भवणार नाहीत.
हे देखील वाचा: स्वयंपाक करताना हाताला चटका बसला? फोड येण्याच्या आधी करा हे घरगुती उपाय
सकाळी उठल्यानंतर तुम्ही एक ग्लास पाणी गरम करून त्यात ओवा आणि आल्याचा तुकडा टाकून मिक्स करून घ्या.टोपातील पाणी अर्धे झाल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. हे पाणी नियमित प्यायल्यास पोट स्वच्छ होण्यास मदत होईल. तसेच आल्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म आरोग्य सुधारण्यास मदत करतात. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर ओवा आणि आल्याच्या पाण्याचे सेवन करावे. हे पाणी आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे.
हे देखील वाचा: रेटिनॉलच्या कमतरतेने दृष्टी होईल अंधुक, वेळीच खायला सुरू करा 5 पदार्थ
जेवणाला फोडणी देताना हिंगाचा वापर केला जातो. हिंग जेवणात वापरल्यामुळे पदार्थाची चव आणि सुगंध वाढण्यास मदत होते. भाजी किंवा डाळ बनवताना हिंग टाकल्यास पदार्थाची चव आणखीन वाढते. सर्दी, खोकला किंवा ताप आल्यानंतर ओवा आणि हिंगाचे मिश्रण बनवून मुलांना खाण्यास द्या. यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.