Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाजूक जागी वाढलेला मूळव्याध मुळांपासून होईल नष्ट! तीव्र वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

मूळव्याध झाल्यानंतर आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवतात. दैनंदिन आहारात तिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. त्यामुळे आहारात कायमच फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 18, 2026 | 05:30 AM
नाजूक जागी वाढलेला मूळव्याध मुळांपासून होईल नष्ट! तीव्र वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

नाजूक जागी वाढलेला मूळव्याध मुळांपासून होईल नष्ट! तीव्र वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

Follow Us
Follow Us:

मूळव्याध होण्याची कारणे?
मूळव्याध झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये?

शरीराच्या अंतर्गत अवयवांना होणाऱ्या आजरांच्या वेदना अतिशय तीव्र आणि जीवघेण्या असतात. त्यातील गंभीर समस्या म्हणून मूळव्याध. मूळव्याध झाल्यानंतर गुदद्वाराच्या आतील किंवा बाहेरील रक्तवाहिन्यांना सूज येते. ही सूज कालांतराने वाढते आणि खूप जास्त तीव्र वेदना होतात. शरीरात निर्माण झालेली फायबरची कमतरता, दीर्घकालीन बद्धकोष्ठता, शौचाच्या वेळी लावण्यात येणारा जोर इत्यादी गोष्टींमुळे मूळव्याध होतो. मूळव्याध झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत, मात्र कालांतराने या लक्षणांकडे वाढ होते आणि संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते.

मूळव्याध हा आजार वारंवार होतो. त्यामुळे योग्य औषध आणि शरीरास आवश्यक असलेला आहार घेणे आवश्यक आहे. मूळव्याध झाल्यानंतर रुग्णाला उठताना, बसताना आणि विशेषतः मलविसर्जन करताना असह्य वेदना, आग आणि काहीवेळा रक्त पडण्याची भीती असते. रोजच्या आहारात अतितिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे मूळव्याध आणखीनच तीव्र होतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला मुळव्याधाच्या समस्येपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

कमी पाणी पिणे करेल शरीराचा घातक! डिहायड्रेशन झाल्यानंतर आरोग्यासंबंधित उद्भवतात ‘या’ गंभीर समस्या

मूळव्याध होण्याची कारणे:

  • पोट बिघडणे
  • एकाच स्थितीत जास्त वेळ बसणे
  • जास्त वेळ उभे राहणे
  • लठ्ठपणा
  • नैसर्गिक विधीसाठी जोर लावणे
  • फायबरची कमतरता
  • आनुवांशिक कारण

मूळव्याध झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे:

  • शौचाच्या ठिकाणी रक्तस्त्राव होणे
  • शौचाला आल्यानंतर आग आणि वेदना होणे
  • शौचाच्या ठिकाणी खाज येणे
  • गुदद्नारेत सूज येणे
  • शौचाच्या जागेतून मांस बाहेर येणे.

तिखट आणि मसालेदार पदार्थांचा अजिबात सेवन न करणे:

मूळव्याध होण्याचे मुख्य कारण म्हणजे तिखट आणि अति मसालेदार पदार्थांचे अतिसेवन करणे. लाल मिरची, गरम मसाला आणि चटपटीत पदार्थ गुदद्वाराच्या जखमांमध्ये वाढवतात, ज्यामुळे बसल्यानंतर खूप जास्त वेदना होतात. तिखट पदार्थांचे सेवन केल्यानंतर शौचाच्या वेळी असह्य वेदना होतात आणि सुकलेल्या जखमा पुन्हा सक्रिय होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय जखमांमधून काहीवेळा रक्त सुद्धा येते. त्यामुळे रोजच्या आहारात अतिउष्ण आणि अतितिखट पदार्थांचे अजिबात सेवन करू नये.

हृदयाच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, कोणत्याही क्षणी होईल मृत्यू

फास्ट फूड आणि मैद्याचे पदार्थ:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पिझ्झा, बर्गर, पास्ता किंवा मैद्यापासून बनवलेले पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. पण या पदार्थांमध्ये असलेला मैदा शरीरासाठी अतिशय घातक ठरतो. मैद्यामध्ये फायबरचे प्रमाण अजिबात आढळून येत नाही. ज्यामुळे अन्नाचे पचन होण्यास अनेक अडथळे निर्माण होतात. कठीण मल बाहेर टाकताना गुदद्वारावर जास्तीचा तणाव येतो आणि काहीवेळा रक्त पडण्याची जास्त भीती असते. शरीरातील फायबरची कमतरता भरून काढण्यासाठी मैद्याऐवजी ओट्सचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Hemorrhoids growing in sensitive areas will be eliminated from the roots follow these simple tips to get relief from severe pain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • constipation
  • Health Care Tips
  • piles

संबंधित बातम्या

‘या’ सॅलडचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कायमच राहाल हेल्दी, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच शरीराला मिळेल ऊर्जा
1

‘या’ सॅलडचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कायमच राहाल हेल्दी, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच शरीराला मिळेल ऊर्जा

Child Constipation: बाळ शी करताना जोर का लावतं? बद्धकोष्ठता आणि सामान्य कुंथणे यातील जाणून घ्या फरक
2

Child Constipation: बाळ शी करताना जोर का लावतं? बद्धकोष्ठता आणि सामान्य कुंथणे यातील जाणून घ्या फरक

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन
3

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन
4

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.