
Fatty Liver: सतत पोट दुखतंय? सावधान! असू शकतं फॅटी लिव्हर, ‘अशी’ ओळखा लक्षणे
टोमॅटो केवळ जेवणाची चव वाढवत नाहीत, तर ते तुमच्या त्वचेसाठीही वरदान आहेत. त्यामध्ये लायकोपीन नावाचे एक अँटिऑक्सिडेंट असते, जे सूर्याच्या हानिकारक यूव्ही किरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे रक्षण करते. टोमॅटो खाल्ल्याने चेहऱ्यावरील फाइन लाइन्स आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होऊ शकते. तुम्ही हे सॅलडमध्ये किंवा याची चटणी बनवून देखील खाऊ शकता.
बदाम नेहमीच मेंदूसाठी उत्तम मानले जातात. परंतु हे त्वचा आणि केसांसाठी व्हिटॅमिन ईचा एक उत्तम स्रोत देखील आहेत. बदामांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते, जे त्वचा मॉइश्चराइज्ड ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे चाळीशीनंतरही चेहऱ्यावर ग्लो येतो.
रताळ्यांमध्ये बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते, ज्याचे शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतर होते. व्हिटॅमिन ए स्कीन रिपेयर करण्यास आणि तिला सॉफ्ट व ग्लोइंग ठेवण्यास मदत करते. शिवाय, रताळे त्वचेला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासूनही वाचवतात. तुम्ही रताळे उकडून सॅलडमध्ये खाऊ शकता.
पालक ही भाजी त्वचेसाठी आणि केसांसाठी नैसर्गिक वरदान आहे. पालकमध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई आणि के, तसेच आयरन असते. व्हिटॅमिन सी त्वचेतील कोलेजनचे उत्पादन वाढवते, ज्यामुळे स्कीन टाइट आणि तरुण दिसते.
ब्लॅकबेरी, स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी यासारख्या फळांमध्ये अँथोसायनिन नावाचे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे अँटी- एजिंगचे काम करतात. तसेच, यामुळे त्वचेतील कोलाजन टिकून राहते. या फळांचे सेवन केल्याने तुमच्या त्वचेला नॅचरल ग्लो येतो.
आवळा हा व्हिटॅमिन सीचा खजिना आहे. त्वचेतील कोलाजन वाढवण्यासाठी तसेच सुरकुत्या आणि फाइन लाइन्स कमी करण्यासाठी तुम्ही आवळ्याचे सेवन करु शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.
Health Tips: डायबिटीजचे रुग्ण आहात? नाश्त्यामध्ये चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ