Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फिरण्यासाठी परफेक्ट आहे राजस्थानमधील जवाई, गर्दीपासून दूर ऑफबीट डेस्टिनेशन शोधताय तर या ठिकाणाला नक्की भेट द्या

राजस्थानमधील जवाई हे शांत, निसर्गरम्य आणि ऑफबीट ठिकाण पर्यटकांसाठी एक वेगळाच अनुभव देतं. गर्दीपासून दूर राहून वन्यजीव आणि सुंदर निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हे परफेक्ट डेस्टिनेशन आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 02, 2026 | 08:33 AM
फिरण्यासाठी परफेक्ट आहे राजस्थानमधील जवाई, गर्दीपासून दूर ऑफबीट डेस्टिनेशन शोधताय तर या ठिकाणाला नक्की भेट द्या

फिरण्यासाठी परफेक्ट आहे राजस्थानमधील जवाई, गर्दीपासून दूर ऑफबीट डेस्टिनेशन शोधताय तर या ठिकाणाला नक्की भेट द्या

Follow Us
Follow Us:
  • मोकळ्या टेकड्यांवर बिबट्यांना जवळून पाहण्याची अनोखी संधी.
  • जवाई धरण आणि आजूबाजूचा निसर्ग अत्यंत आकर्षक.
  • ऑक्टोबर ते मार्च हा भेटीसाठी सर्वोत्तम काळ.
राजस्थान हे भारतातील एक लोकप्रिय राज्य आहे. ते आपल्या सांस्कृतिक वारसा आणि समृद्ध परंपरांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. सोनेरी वाळवंट, सुंदर पर्वतरांगा आणि भव्य महालांनी भरलेले हे राज्य पर्यटकांचे नेहमीच स्वागत करते. अनेक सेलिब्रेटींचे विवाहसोहळे देखील या ठिकाणी पार पडले आहेत. अशातच आज आम्ही तुम्हाला राजस्थानमधील एका अशा ऑफबीट डेस्टीनेशनची माहिती सांगत आहोत जिथे तुम्ही पर्यटनाचा एक अद्भूत अनुभव घेऊ शकता. हे ठिकाण राजस्थानच्या पाली जिल्ह्यात वसले आहे. ते सुमेरपूर तहसीलच्या अंतर्गत येते. याचे नाव आहे सवाई. राजस्थानमधील हे ठिकाण फार कमी लोकांना ठाऊक आहे त्यामुळे इथे कोणत्याही गजबटाशिवाय पर्यटनाचा चांगला अनुभव घेता येऊ शकतो.

Travel News : ताऱ्यांच जग पाहण्याची संधी, महाराष्ट्रात खुले झालेत नवे टुरिस्ट स्पॉट

जवाईला भेट देणे विशेष का आहे?

जगभरातील बिबटे बहुतेकदा घनदाट जंगलांमध्ये लपून राहतात. पण जवाईमध्ये मोकळ्या ग्रॅनाइटच्या टेकड्यांवर त्यांचे वास्तव आपल्याला पाहायला मिळते. इथे तुम्हाला बिबटे देखील पाहता येतील. मुख्य म्हणजे, इथे बिबटे विनाकारण माणसांवर हल्ला करत नाही ज्यामुळे कोणत्याही भितीशिवाय तुम्हाला जवळून त्यांना पाहता येईल.

जवाई धरण

या ठिकाणाचे मुख्य आकर्षण म्हणजे जवाई धरण. जोधपूरचे महाराजा उम्मेद सिंग यांनी बांधलेले हे धरण पश्चिम राजस्थानमधील सर्वात मोठे धरण आहे. जोधपूर आणि पालीसाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत असल्यामुळे त्याला मारवाडचे अमृच सरोवर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणाहून दिसणारे दृश्य अत्यंत सुंदर आहे.

देवगिरी मंदिर

इथे तुम्हाला देवगिरीचे प्राचीन मंदिर देखील पाहायला मिळेल. विशाल खडकाखाली बांधलेले हे मंदिर स्थानिक भक्तीचे केंद्र असून ते देवी चामुंडाला समर्पित आहे. मंदिराच्या पायऱ्यांवर किंवा जवळ बिबटे बसलेले दिसतात पण ते भाविकांना त्रास देत नाहीत.

भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणता?

या ठिकाणाला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी सर्वात उत्तम मानला जातो. कारण या काळात हवामान आल्हाददायक असते. तसेच याकाळात तुम्हाला या परिसरात अनेक प्राणी पाहायला मिळतात.

‘गंगा एक्सप्रेस वे’चा पर्यटनाला किती फायदा होणार? कोणत्या धार्मिक स्थळांना जोडला जाणार हा मार्ग

कसे पोहोचायचे?

जवाईसाठी सर्वात जवळचे विमानतळ उदरपूर (सुमारे १४० किमी) किंवा जोधपूर (सुमारे १६० किमी) आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन मोरिबेडा किंवा फालना आहे. इथून पुढे कॅब करुन जवाईला जाता येते. याशिवाय रेल्वे मार्गानेही जवाईला जाता येते.

Web Title: Best offbeat destination know how to visit rajasthan jawai travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 08:33 AM

Topics:  

  • places to visit
  • rajasthan
  • travel news

संबंधित बातम्या

युरोपचे रहस्यमय ठिकाण जिथे महिलांच्या प्रवेशावर आहे बंदी, मादा प्राण्यांवरही लागू होतो नियम
1

युरोपचे रहस्यमय ठिकाण जिथे महिलांच्या प्रवेशावर आहे बंदी, मादा प्राण्यांवरही लागू होतो नियम

रेल्वेचे नाईट रूल्स माहिती आहेत का? रात्री 10 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ट्रेनमध्ये या गोष्टी करण्यास आहे मनाई
2

रेल्वेचे नाईट रूल्स माहिती आहेत का? रात्री 10 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ट्रेनमध्ये या गोष्टी करण्यास आहे मनाई

७७ वर्षांची प्रतीक्षा संपली! गावात पहिल्यांदाच पोहोचली सरकारी बस, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना; Video Viral
3

७७ वर्षांची प्रतीक्षा संपली! गावात पहिल्यांदाच पोहोचली सरकारी बस, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना; Video Viral

गुफेच्या आत विराजमान आहेत भगवान शंकर, श्री केशवनाथेश्वर मंदिराची खासियत जाणून घ्या
4

गुफेच्या आत विराजमान आहेत भगवान शंकर, श्री केशवनाथेश्वर मंदिराची खासियत जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.