प्रत्येक स्वंयपाक घरात (home) टोमॅटोचा (tomatoes)वापर केला जातो. भाजीत असो किंवा एखाद्या स्नॅक्सची चव वाढवायची असो टोमॅटोचा वापर केला जातो. टोमॅटो ही रोज वापरली जाणारी भाजी आहे, जी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. बरेच लोक त्यांची त्वचा डागरहित आणि चमकण्यासाठी देखील टोमॅटोची पेस्ट वापरतात कारण त्यात अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. या उपायामुळे त्वचा सुंदर बनवते आणि सूर्यप्रकाशामुळे त्वचेला होणारी समस्या दूर कारण्यास टोमॅटो फायदेशीर ठरतो. परंतु टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने तुम्हाला आरोग्याशी निगडित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला तर मग जाणून घेऊया टोमॅटो जास्त प्रमाणात खाल्ल्याने कोणत्या समस्या उद्भवतात.
टोमॅटोमध्ये कॅल्शियम आणि ऑक्सलेट भरपूर प्रमाणात असतात. मात्र हे घटक शरीराला मर्यादित प्रमाणात आवश्यक असतात. जास्त प्रमाण हे घटक शरीराला घातक ठरतात. उदाहरणार्थ, आपण आवश्यकतेपेक्षा जास्त अन्न खातो, तेव्हा आपले आतडे त्यांच कार्य व्यवस्थित करू शकत नाही. ज्यामुळे जास्त प्रमाणात खाल्लेले अन्न कोलेस्ट्रॉलच्या रूपात जमा होऊ लागते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण जास्त प्रमाणात टोमॅटोचे सेवन करतो तेव्हा आपल्या शरीरात ऑक्सलेटचे प्रमाण वाढू लागते. यामुळे किडनी स्टोनची समस्या निर्माण होते.
टोमॅटो ही बाराही महिने मिळणारी भाजी आहे. टोमॅटोचा वापर सर्वच ऋतूंमध्ये केला जातो, मात्र पावसाळ्यात टोमॅटोचा वापर थोडा जपून केला पाहिजे. कारण टोमॅटोमध्ये साल्मोनेला नावाचा जीवाणू असतो. जो पोटात गेल्यावर विष निर्माण करतो. यामुळे आपल्याला अतिसार हा आजार होऊ शकतो. त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी टोमॅटोचे सेवन मर्यादित प्रमाणात केले पाहिजे.