Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅन्सर रुग्णांना मोठा धक्का! PMJAY पॅनेलमधून ३०० डॉक्टरांना वगळले, भविष्यात निर्माण होऊ शकते तत्ज्ञांची कमतरता

अनेक राज्यांमध्ये ३०० कर्करोग तज्ञांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या यादीमधून वगळण्यात आले आहे. यामुळे भविष्यात मोठे संकट उद्भवू शकते. कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या पाहता, ही अतिशय चिंतेची बाब आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 06, 2026 | 12:08 PM
कॅन्सर रुग्णांना मोठा धक्का! PMJAY पॅनेलमधून ३०० डॉक्टरांना वगळले, भविष्यात निर्माण होऊ शकते तत्ज्ञांची कमतरता

कॅन्सर रुग्णांना मोठा धक्का! PMJAY पॅनेलमधून ३०० डॉक्टरांना वगळले, भविष्यात निर्माण होऊ शकते तत्ज्ञांची कमतरता

Follow Us
Close
Follow Us:

कॅन्सर रुग्णांसाठी मोठा धक्का?
PMJAY पॅनेलमधून ३०० डॉक्टरांना का वगळले?
PMJAY पॅनेलमधून डॉक्टरांना वगळणे योग्य की अयोग्य?

जगभरातील सर्वच देशांमध्ये कॅन्सर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. प्रत्येक वर्षी देशभरात सुमारे १५ लाख कर्करोगाच्या रुग्णांची नोंद केली जाते. ही संख्या द्वितीय किंवा तृतीय श्रेणीच्या शहराच्या एकूण लोकसंख्ये एवढी आहे. भारतात गर्भाशय, स्तन, आतड्या आणि तोंडाच्या कॅन्सर रुग्णांची संख्या मोठी असल्याचे निदर्शनात आले आहे. भारतात कॅन्सर हा मोठे आरोग्य संकट म्हणून उदयास येत आहे. झपाट्याने वाढत असलेल्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. याशिवाय शरीराच्या कोणत्याही अवयवाला कॅन्सरची लागण होऊ शकते. त्यामुळे शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)

सतत आंबट ढेकर येतात? जेवताना केलेली एक चूक शरीरासाठी ठरेल धोक्याची, अपचनाच्या समस्येवर करा ‘हे’ उपाय

कॅन्सर झाल्यानंतर योग्य उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा हा आजार संपूर्ण शरीरात पसरू शकतो. दरम्यान, अनेक राज्यांमध्ये शेकडो कर्करोग तज्ञांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या यादीमधून वगळण्यात आले आहे. यामुळे देशात मोठे आरोग्यासंबंधित संकट उद्भवू शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. सामान्य लोकांना कर्करोगाच्या उपचारासाठी विशेषज्ञ डॉक्टरांची कमतरता भासेल? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. डॉक्टरांकडे पुरेसा अनुभव आणि प्रशिक्षण आहे, परंतु त्यांच्याकडे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने मान्यता दिलेली पदवी नाही.

पदव्यांमध्ये एमडी पदवीचा समावेश सुद्धा करण्यात आला आहे. पॅनेलमधून वगळण्यात आलेल्या डॉक्टरांना, त्यांनी खाजगी क्षेत्रात फेलोशिप प्रशिक्षण घेतले असल्याचे कारण देत वगळण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते, हा निर्णय अतिशय चुकीचा आहे. ते निदर्शनास आणून देतात की काही दशकांपूर्वीपर्यंत, ऑन्कोलॉजी शिकण्याचा फेलोशिप हा एकमेव मार्ग होता. त्या वेळी कोणताही औपचारिक अभ्यासक्रम नसल्यामुळे फेलोशिप केली जायची. एवढेच नाही तर, आजही पदवी मिळवल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणानंतर डॉक्टरांनी कर्करोग रुग्णालयात दोन ते तीन वर्षे फेलोशिपवर काम करावे, याला प्राधान्य दिले जात आहे.

केंद्र सरकारच्या जन आरोग्य योजनेअंतर्गत जारी केलेल्या आयुष्मान कार्डवर उपचारासाठी अवलंबून असलेल्या लोकांच्या समस्या विशेषतः वाढतील. त्यामुळे दुर्बळ घटकांतील लोकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की भारतात आधीच कॅन्सर तज्ज्ञांची कमतरता आहे.२०१८ च्या अंदाजानुसार, देशात प्रत्येक १० लाख लोकसंख्येमागे एक कर्करोग तज्ञ आहे. पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या पॅनेलमधून हटवण्यात आलेल्या डॉक्टरांमध्ये अनेक नामांकित डॉक्टरांचा समावेश आहे. यातील बरेच डॉक्टर कॅन्सर विभागातील तज्ज्ञ डॉक्टर आहेत. काही जण वैद्यकीय संचालक, शिक्षक आणि वरिष्ठ शल्यचिकित्सक असून देशभरातील ३०० डॉक्टरांना पॅनेलमधून हटवण्यात आले आहे.

कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन न करता कोलेस्ट्रॉल होईल नष्ट! दैनंदिन जीवनातील ‘या’ सवयी शरीरासाठी ठरतील फायदेशीर

संपूर्ण देशभरात फक्त ४००० कर्करोग तज्ज्ञ आहेत. त्यातील तिघांना पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या पॅनेलमधून वगळणे हा मोठा धक्का असू शकतो. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे रुग्णांना, विशेषतः द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांमधील रुग्णांना उपचारासंबंधित मोठा फटका बसू शकतो. कॅन्सरची वाढती संख्या पाहता भविष्यात कॅन्सर तज्ज्ञांची कमतरता भासू शकते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Big shock for cancer patients 300 doctors excluded from pmjay panel shortage of specialists may arise in future

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 12:08 PM

Topics:  

  • cancer
  • cancer risks
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

उन्हाळ्यात सतत तहान लागते म्हणून फ्रिजचे पाणी पित असाल तर थांबा! जाणून घ्या थंड पाणी पिण्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम
1

उन्हाळ्यात सतत तहान लागते म्हणून फ्रिजचे पाणी पित असाल तर थांबा! जाणून घ्या थंड पाणी पिण्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

अचानक हृदयाची धडधड वाढते? उच्च रक्तदाब वाढल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
2

अचानक हृदयाची धडधड वाढते? उच्च रक्तदाब वाढल्यानंतर शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? मग आहारात ‘या’ ६ सुपरफूड्सचा करा समावेश
3

Heart Health: हृदय निरोगी ठेवायचंय? मग आहारात ‘या’ ६ सुपरफूड्सचा करा समावेश

अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असलेले सफरचंद शरीरासाठी ठरेल वरदान! नियमित खाल्ल्यास कधीच पडणार नाही आजारी
4

अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध असलेले सफरचंद शरीरासाठी ठरेल वरदान! नियमित खाल्ल्यास कधीच पडणार नाही आजारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.