
ब्लॅकहेड्स- टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर मसूर डाळीचा 'या' पद्धतीने करा वापर, नॅचरल स्क्रबनं त्वचा दिसेल सुंदर
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर वातावरणात सतत काहींना काही बदल होत असतात. दमट वातावरणामुळे त्वचा खूप जास्त तेलकट आणि चिकट होऊन जाते. ज्याच्या परिणामामुळे त्वचेवर पिंपल्स आणि मुरूम येतात. सतत येणाऱ्या घामामुळे धुळीचे कण एकत्र येऊन त्वचेची छिद्रे बंद होऊन जातात. याशिवाय चेहऱ्यावर पिंपल्स, ब्लॅकहेड्स आणि टॅनिंगसारख्या समस्या वाढून त्वचा पूर्णपणे निस्तेज होऊन जाते. त्वचेवर साचून राहिलेल्या घाणीमुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि बारीक बारीक मुरूम येतात, ज्यामुळे त्वचा निस्तेज आणि डेड स्किन वाढून काळी दिसू लागते. चेहऱ्यावर वाढलेली डेड स्किन कमी करण्यासाठी कायमच महागड्या केमिकल युक्त क्रीम आणि स्क्रब लावले जातात.(फोटो सौजन्य – istock)
Anti Ageing: वय वाढलं तरी चेहऱ्यावर दिसणार नाही! तरुण दिसण्यासाठी ‘हे’ नियम लक्षात ठेवा
स्क्रब केल्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होते पण वारंवार केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर त्वचेसाठी करणे अजिबात चांगले नाही. यामुळे त्वचेला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन कमी करण्यासाठी मसूर डाळीचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल जाणून घेऊया. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर कायमच केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ वापरावेत. यामुळे चेहऱ्यावरील नॅचरल ग्लो कायम टिकून राहतो आणि त्वचा अतिशय सुंदर दिसते. स्क्रब त्वचेतील टॅनिंग पूर्णपणे काढून टाकते आणि त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करते.
मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर
स्क्रब केल्यामुळे त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होते. मुगाच्या डाळीमुळे ओपन पोअर्स स्वच्छ होतात आणि टॅनिंग कमी होण्यास मदत होते. संत्र्याच्या सालीमध्ये विटामिन सी असल्यामुळे त्वचेवरील काळे डाग कमी होण्यास मदत होतात. केशर काड्यांमध्ये असलेले गुणकारी घटक त्वचेवरील नॅचरल ग्लो वाढवण्यास मदत करते.
Ans: भिजवलेली मसूर डाळ बारीक करून त्यात दही किंवा कोरफड जेल मिसळून सौम्य फेस स्क्रब किंवा पॅक तयार करता येतो.
Ans: मसूर डाळीचा सौम्य स्क्रब त्वचेवरील मृत पेशी आणि अतिरिक्त तेल साफ करण्यास मदत करू शकतो. मात्र, ब्लॅकहेड्स पूर्णपणे दूर होतीलच असे नाही.
Ans: नियमित आणि सौम्य एक्सफोलिएशनमुळे त्वचा अधिक स्वच्छ व उजळ दिसू शकते; मात्र टॅनिंग लगेच किंवा कायमचे निघून जाईल असा दावा करता येत नाही.