Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मलातून रक्त येणे म्हणजे फक्त मूळव्याध नाही! शरीरसंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

मूळव्याध किंवा शरीरसंबंधित गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर मलातून रक्त पडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे मलातून वारंवार रक्त येत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 21, 2026 | 03:45 PM
मलातून रक्त येणे म्हणजे फक्त मूळव्याध नाही! शरीरसंबंधित असू शकतो 'या' गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

मलातून रक्त येणे म्हणजे फक्त मूळव्याध नाही! शरीरसंबंधित असू शकतो 'या' गंभीर आजारांचा धोका, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Follow Us
Follow Us:

ठाण्यातील गॅस्ट्रोक्युअर एंडोस्कोपी सेंटरमध्ये नुकताच एक अनुभव समोर आला. ३० वर्षीय एक तरुण गंभीर अवस्थेत दाखल झाला होता. काही दिवसांपासून त्याला मलातून मोठ्या प्रमाणात रक्त जाणे, झपाट्याने वजन कमी होणे आणि तीव्र ताप अशी लक्षणे जाणवत होती. सुरुवातीला त्याने ही लक्षणे मूळव्याधामुळे होत असल्याचे समजून दुर्लक्ष केले. मात्र, त्रास दिवसेंदिवस वाढत गेल्याने अखेर त्याने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा निर्णय घेतला.(फोटो सौजन्य – istock)

मुलींना लहान वयातच मासिक पाळी का येते? मुलींचे बालपण टिकवून ठेवण्यासाठी आईवडिलांनी घ्याला हवी ‘या’ गोष्टींची काळजी

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. राजदीप मोरे यांनी सखोल तपासणी केल्यानंतर तातडीने आवश्यक चाचण्या सुचवल्या. रक्ततपासणीत रुग्णाचे हिमोग्लोबिन अत्यंत कमी असल्याचे आणि पांढऱ्या रक्तपेशींची संख्या लक्षणीयरीत्या वाढलेली असल्याचे आढळून आले. रुग्णाच्या आतड्यांची अधिक सखोल तपासणी करण्यासाठी कोलोनोस्कोपी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोलोनोस्कोपीदरम्यान मोठ्या आतड्यात सर्वत्र खोल जखमा म्हणजेच अल्सर आढळून आले. बायोप्सीच्या अहवालानंतर रुग्णाला अल्सरेटिव्ह कोलायटिस असल्याचे निदान झाले. हा रोग प्रतिकारशक्तीशी संबंधित एक दीर्घकालीन आजार आहे, ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणाच आतड्यांवर हल्ला करते. वेळेत योग्य उपचार न झाल्यास मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होण्याचा, तसेच इतर गुंतागुंती निर्माण होण्याचा गंभीर धोका असतो.

शिल्लक राहिलेला भात सतत गरम करून खाता? फूड पॉयझनिंग होऊन आतड्यांचे होईल गंभीर नुकसान, जाणून घ्या भात शिजवण्याची पद्धत

निदान झाल्यानंतर लगेच योग्य उपचारपद्धती सुरू करण्यात आली. काही दिवसांतच रक्तस्राव थांबला आणि रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसू लागली. अवघ्या आठवड्याभरात त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या तो नियमित फॉलोअपवर असून त्याची तब्येत सुधारत आहे. डॉ. मोरे या निमित्ताने एक महत्त्वाचा इशारा दिला आहे की, “मलातून रक्त येणे हे नेहमी मूळव्याधामुळेच होते असे नाही. अनेकदा लोक स्वतःच निदान करतात आणि उपचार टाळतात, निदान झाल्यानंतर लगेचच योग्य उपचारपद्धती सुरू करण्यात आली. काही दिवसांतच रक्तस्राव थांबला आणि रुग्णाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा दिसू लागली. अवघ्या आठवड्याभरात त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या तो नियमित फॉलोअपवर असून त्याची तब्येत सुधारत आहे.

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: मलातून रक्त येणे म्हणजे नेहमीच मूळव्याध असते का?

    Ans: नाही. मलातून रक्त येणे हे मूळव्याध व्यतिरिक्त आतड्यांचे आजार, इन्फेक्शन, अल्सर किंवा कोलन कॅन्सरसारख्या गंभीर समस्यांचेही लक्षण असू शकते.

  • Que: मलात लाल किंवा काळसर रक्त दिसणे धोकादायक असू शकते का?

    Ans: होय. रक्ताचा रंग आणि प्रमाण यावरून समस्या गंभीर असू शकते. त्यामुळे त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

  • Que: मलातून रक्त येणे थांबवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी?

    Ans: फायबरयुक्त आहार, भरपूर पाणी, स्वच्छता आणि नियमित व्यायाम यामुळे पचन सुधारण्यास मदत होऊ शकते.

Web Title: Bleeding is not just piles the risk of these serious diseases may be related to the body know the opinion of experts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • intestines
  • piles

संबंधित बातम्या

Asthma: हवामानातील बदल ठरू शकतो अस्थमाच्या रुग्णांसाठी धोकादायक; ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
1

Asthma: हवामानातील बदल ठरू शकतो अस्थमाच्या रुग्णांसाठी धोकादायक; ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

त्वचेवरील तारुण्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्याचा एकमेव पर्याय म्हणजे कोमट पाणी, उपाशी पोटी नियमित करा सेवन
2

त्वचेवरील तारुण्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्याचा एकमेव पर्याय म्हणजे कोमट पाणी, उपाशी पोटी नियमित करा सेवन

पावसाळ्यात आहारात होणाऱ्या ‘या’ बदलांमुळे वाढू शकतो Food Poisoning चा धोका! अन्यथा आजारपण वाढून उद्भवतील पोटाचे विकार
3

पावसाळ्यात आहारात होणाऱ्या ‘या’ बदलांमुळे वाढू शकतो Food Poisoning चा धोका! अन्यथा आजारपण वाढून उद्भवतील पोटाचे विकार

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे हातपायांमध्ये वेदना आणि गोळे येतात? मग नियमित खा ‘हा’ पौष्टिक लाडू, रात्रीच्या वेळी लागेल शांत झोप
4

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे हातपायांमध्ये वेदना आणि गोळे येतात? मग नियमित खा ‘हा’ पौष्टिक लाडू, रात्रीच्या वेळी लागेल शांत झोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.