
गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
Breakfast Recipe: सगळीकडे गौरी गणपती सणाचा मोठा उत्साह आहे. सणावारांच्या दिवसांमध्ये घरात गोड पदार्थ मोठ्या प्रमाणावर बनवले जातात. पण कायमच गोड खाऊन कंटाळा आल्यानंतर झणझणीत पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. सकाळच्या नाश्त्यात कांदापोहे, शिरा किंवा उपमा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा झाल्यास झटपट तुम्ही कांद्याचे कुरकुरीत थालीपीठ बनवू शकता. कांद्याचे थालीपीठ चवीला अतिशय सुंदर लागते. बऱ्याचदा घरातील लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच कांदा आणि भाज्या खाण्याचा खूप जास्त कंटाळा करतात. अशावेळी मुलांना थालीपीठ बनवून खाण्यास द्यावे. थालीपीठमध्ये वेगवेगळ्या भाजण्या, भाजी आणि चविष्ट मसाल्यांचा वापर केला जातो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात वेगवेगळे चविष्ट आणि हेल्दी पदार्थ बनवून खावेत. चला तर जाणून घेऊया कांद्याचे थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)