
साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी
Breakfast Recipe: सुट्टीच्या दिवशी सगळ्यांचं नाश्त्यामध्ये विविध चविष्ट पदार्थ खाण्यास हवे असतात. कायमच कांदापोहे, साऊथ इंडियन पदार्थ आणि उपमा खाऊन कंटाळा आल्यानंतर नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही साध्या पोह्यांना चायनीज तडका देत शेजवान पोहे बनवू शकता. शेजवान चटणी कोणत्याही पदार्थासोबत खाल्ली जाते. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. अन्यथा शरीराला विविध आजारांची लागण होऊ शकते. कामाच्या धावपळीमध्ये अनेक लोक नाश्ता न करता बाहेर निघून जातात. पण असे करणे चुकीचे आहे. उपाशी पोटी बाहेर गेल्यामुळे शरीराला गंभीर आजारांची लागण होऊ शकते. त्यामुळे सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करावा. नाश्त्यात वेगवेगळ्या चविष्ट पदार्थांसोबत शरीराला पोषण देणारे पदार्थ सुद्धा खावेत. चला तर जाणून घेऊया शेजवान पोहे बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)