
Masala Buttermilk Recipe: प्रत्येक घोटात गारवा मिळेल थंडावा! उष्णतेपासून बचाव करण्यासाठी घरीच तयार करा थंडगार मसाला ताक
Masala Buttermilk Recipe: राज्यासह संर्पून देशभरात उष्णता वाढली आहे. ऑक्टोबर महिन्यात वाढलेल्या गरर्मीचा परिणाम शरीरावर होत आहे. उन्हाचा तडाखा पुन्हा जाणवू लागल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. घामाच्या धारा, सतत लागणारी तहान आणि थकव्यामुळे आरोग्य पू्र्णपणे बिघाडून गेले आहे. त्यामुळे गर्मीच्या दिवसांसध्ये भरपूर पाणी पिण्याचा सल्ला कायमच दिला जातो. केवळ पाणीच नाहीतर आहाराकडे लक्ष देणेसुद्धा तितकेच गरजेचे आहे. गर्मी वाढल्यानंतर बाजारातील विकतची पेय किंवा आईस्क्रीम आणून खाल्ले जाते. पण त्याऐवजी जेवणासोबत एक ग्लास ताक प्यावे. ताक प्यायल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. दह्यापासून तयार केलेले ताक शरीराला प्रथिने आणि कॅल्शियमसारखी पोषक तत्त्वे देतात. उन्हामुळे घाम येत असेल, तर दिवसभरात एक ग्लास ताक प्यावे. ताक प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया मसाला ताक बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)
Falooda Recipe : घरी कसा बनवायचा थंडगार फालुदा? ही रेसिपी नोट करा, लहान मुले होतील खुश