Kolambi Rice Recipe : तुम्हाला माहितीये का? ताज्या कोळंबीपासून तुम्ही मसालेदार आणि रुचकर चवीचा कोळंबी भात तयार करु शकता. हा भात दुपारच्या किंवा रात्रीच्या मेजवाणीसाठी एक उत्तम पर्याय ठरेल.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
मासेप्रमींमध्ये कोळंबी हा प्रकार जास्तच लोकप्रिय.
यापासून बनवलेली रशरशीत भाजी तर आपण अनेकदा खातो.
पण यावेळी घरी तयार करा मसालेदार कोळांबी भात.
महाराष्ट्रातील सी फूड खाद्यसंस्कृतीमध्ये कोळंबीला विशेष महत्त्व आहे. कोळंबीपासून तयार केलेले विविध पदार्थ चवीला अप्रतिम असतात. त्यापैकी कोळंबी भात हा झटपट तयार होणारा, सुगंधी मसाल्यांनी भरलेला आणि जेवणाची रंगत वाढवणारा लोकप्रिय पदार्थ आहे. दुपारच्या जेवणासाठी, रविवारच्या खास मेनूसाठी किंवा पाहुण्यांसाठी काहीतरी वेगळे बनवायचे असेल, तर कोळंबी भात हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. हा भात बनवताना कोळंबी योग्य प्रकारे स्वच्छ करणे आणि जास्त वेळ न शिजवणे महत्त्वाचे असते. त्यामुळे कोळंबी मऊ राहते आणि भाताची चवही खुलते. चला तर मग, घरच्या घरी महाराष्ट्रीयन पद्धतीचा खमंग कोळंबी भात कसा बनवायचा याची सोपी रेसिपीजाणून घेऊया.
यासाठी सर्वप्रथम कोळंबीची साल काढून तिच्या पाठीवरील काळी शीर स्वच्छ काढा. पाण्याने धुऊन त्यातील अतिरिक्त पाणी निथळू द्या.
आता एका भांड्यात कोळंबी काढून त्यात हळद, लाल तिखट, मीठ आणि लिंबाचा रस घालून चांगले मिसळा. हे मिश्रण १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवा.
तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर साधारण १५ ते २० मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. यामुळे भात शिजताना दाणे चांगले फुलतात आणि मोकळे राहण्यास मदत होते.
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, तमालपत्र, दालचिनी, लवंग आणि वेलची घाला. फोडणी तडतडल्यावर चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घालून कांदा सोनेरी होईपर्यंत परता. त्यानंतर आले-लसूण पेस्ट घाला. टोमॅटो, किसलेले खोबरे आणि थोडी कोथिंबीर घालून मिश्रण मऊ होईपर्यंत शिजवा.
तयार मसाल्यात मॅरिनेट केलेली कोळंबी घाला. त्यावर हळद, लाल तिखट आणि गरम मसाला किंवा मालवणी मसाला घाला.
सर्व साहित्य एकत्र करून मध्यम आचेवर साधारण ३ ते ४ मिनिटे परता. कोळंबीचा रंग बदलू लागला की पुढील कृती करा. जास्त वेळ शिजवू नका, अन्यथा कोळंबी कडक होऊ शकते.
भिजवलेला तांदूळ निथळून मसाल्यात घाला. तांदळाचे दाणे तुटणार नाहीत अशा पद्धतीने हलक्या हाताने मिसळा. त्यात दही आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला. साधारण १ कप तांदळासाठी १½ ते १¾ कप पाणी लागू शकते; तांदळाच्या प्रकारानुसार प्रमाण बदलू शकते. मीठ चवीनुसार घाला.
पाणी उकळू लागल्यावर गॅस मंद करा आणि झाकण ठेवून भात शिजू द्या. साधारण १२ ते १५ मिनिटांत तांदूळ शिजू शकतो. पाणी पूर्ण आटले आहे आणि तांदूळ मऊ झाला आहे का ते तपासा. गरज असल्यास थोडे गरम पाणी घाला. भात शिजताना वारंवार ढवळू नका.
गॅस बंद करून भाताला ५ ते १० मिनिटे झाकून राहू द्या आणि मग चमच्याने ढवळून याला खाण्यासाठी प्लेटीत काढा.
वरुन चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम कोळंबी भात कांद्याची कोशिंबीर, लिंबाच्या फोडी किंवा रायत्यासोबत सर्व्ह करा.
लक्षात घ्या, कोळंबी नेहमी ताजी आणि व्यवस्थित स्वच्छ केलेली वापरा.
Web Title: How to make kolambi rice at home recipe in marathi