
कोजागिरीच्या चांदण्यात घ्या मसाला दुधाचा आस्वाद! घरच्या घरी बनवा चविष्ट रेसिपी
Kojagiri Purnima 2026: यंदाच्या वर्षी कोजागिरी पौर्णिमा २५ ऑक्टोबरला आहे. हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला खूप जास्त महत्व दिले जाते. यादिवशी केलेला उपवास मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला कोजागिरी साजरा केली जाते. मध्यरात्री देवी लक्ष्मी आणि इंद्राची पूजा करून मसाला दुधाचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. या रात्री चंद्र सोळा कलांनी परिपूर्ण असतो आणि चंद्राच्या किरणामधून अमृत वर्ष होते असा समज आहे. त्यामुळे चांदण्यात ठेवलेले हे आटीव दूध आरोग्यासाठी गुणकारी मानले जाते. प्रत्येक घरात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मसाला दूध बनवले जाते. पण बऱ्याचदा दूध मनासारखे होत नाही. त्यामुळे या सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही मसाला दूध बनवू शकता. घरी बनवलेले मसाला दूध चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा फायदेशीर ठरते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)