Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लघवी करताना कायमच जळजळ होते? लघवीच्या रंगावरून ओळखा गंभीर आजारांचे संकेत, दुर्लक्ष करणे शरीरासाठी ठरेल धोक्याचे

लघवीच्या रंगात बदल दिसू लागल्यास दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार करणे फार आवश्यक आहे. अन्यथा आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 26, 2026 | 05:30 AM
लघवी करताना कायमच जळजळ होते? लघवीच्या रंगावरून ओळखा गंभीर आजारांचे संकेत, दुर्लक्ष करणे शरीरासाठी ठरेल धोक्याचे

लघवी करताना कायमच जळजळ होते? लघवीच्या रंगावरून ओळखा गंभीर आजारांचे संकेत, दुर्लक्ष करणे शरीरासाठी ठरेल धोक्याचे

Follow Us
Follow Us:

लघवीच्या रंगात बदल होण्याची कारणे?
लघवीचा कोणता रंग शरीरासाठी धोकादायक मानला जातो?
लघवी स्वच्छ होण्यासाठी कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात?

चुकीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता, अपुरी झोप, जेवणाच्या चुकीच्या वेळा इत्यादी अनेक गोष्टींमुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. कामाच्या धावपळीमध्ये शरीरात दिसून येणाऱ्या लक्षणांकडे फारसे लक्ष दिले जात नाही. पण असे केल्यामुळे सामान्य आजार गंभीर स्वरूप घेतात आणि आरोग्य बिघडून टाकतात. लघवीच्या रंगात बदल जाणवू लागल्यास दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे आवश्यक आहे. लघवीचा रंग केवळ शरीरातील पाण्याची पातळीचं नाहीतर मुत्रपिंड, यकृत आणि संपूर्ण आरोग्यासंबंधित लक्षणे दर्शवते. त्यामुळे लघवीमध्ये बदल दिसू लागल्यास अजिबात दुर्लक्ष करू नये. चला तर जाणून घेऊया लघवीत दिसून येणारे बदल कोणत्या आजाराचे संकेत आहेत. जाणून घ्या सविस्तर.(फोटो सौजन्य – istock)

गॅस – ब्लोटिंगमुळे पोटात कायमच वेदना होतात? जेवणाआधी करा ‘या पदार्थांचे सेवन, अपचनाच्या त्रासापासून मिळेल सुटका

पिवळा फिकट रंग:

उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीरातील पाण्याची पातळी काहीशी कमी होऊन जाते. कडक उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर डिहायड्रेशन होऊन लघवीच्या रंगात बदल होतो. गडद पिवळ्या रंगाची लघवी होऊन जळजळ वाढते. मूत्रपिंडाच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर लघवीच्या रंगामध्ये बदल होतो. शरीरातील विषारी घटक लघवीवाटे बाहेर पडून जातात. लघवीच्या बदलत्या रंगाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.लघवीचा फिकट पिवळा रंग निरोगी आरोग्याचे संकेत दर्शवतो.शरीरातील पाण्याची पातळी संतुलित असल्यास लघवीसंबंधित कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत.

किडनीच्या कार्यात निर्माण झालेले अडथळे थेट लघवीवर परिणाम करतात. मूत्रपिंडाला शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी सुमारे १८९ लिटर रक्त गळले जाते. जीवनशैलीतील बदलांमुळे मूत्रपिंडावर जास्तीचा तणाव येतो. लघवीच्या रंगात गडद पिवळेपणा दिसू लागल्यास शरीरात डिहायड्रेशन वाढल्याचे संकेत आहेत. लघवीच्या समस्यांसोबतच आम्लपित्त, थकवा, चिडचिड आणि लघवीला तीव्र वास येणे इत्यादी लक्षणे सुद्धा दिसू लागतात. लघवीचा रंग खूप जास्त लाल किंवा गुलाबी दिसत असेल तर अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. कारण संसर्ग, किडनी स्टोन किंवा लघवीमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यानंतर लघवीच्या रंगात बदल दिसून येतात.

Secondary Infertility : एका मुलांनंतर दुसऱ्या गर्भधारणेत अडचण? ‘दुय्यम वंध्यत्व’ म्हणजे काय? जाणून घ्या सविस्तर

शरीर निरोगी ठेवण्यासाठी उपाय:

शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहिल्यास लघवीच्या रंगात बदल होत नाही. त्यामुळे नियमित २ ते ३ लिटर पाण्याचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. एकाच वेळी खूप जास्त पाणी न पिता तहान लागेल तेव्हा पाणी पिणे आवश्यक आहे. याशिवाय जास्त साखर असलेले आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांचा आहारात अजिबात समावेश करू नये. यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: लघवी करताना जळजळ होण्याची कारणे कोणती असू शकतात?

    Ans: युरिन इन्फेक्शन (UTI), शरीरात पाण्याची कमतरता, किडनी स्टोन, काही औषधांचे साइड इफेक्ट्स किंवा स्वच्छतेचा अभाव ही प्रमुख कारणे असू शकतात.

  • Que: लघवीचा रंग कोणते संकेत देतो?

    Ans: फिकट पिवळा रंग सामान्य मानला जातो. गडद पिवळा म्हणजे डिहायड्रेशन, लाल/तपकिरी रंग रक्ताची शक्यता दर्शवू शकतो, तर खूपच फिकट रंग जास्त पाणी पिण्याचे संकेत देतो.

  • Que: लघवीच्या समस्या टाळण्यासाठी काय करावे?

    Ans: हलक्या त्रासात पाणी जास्त पिणे, नारळपाणी, क्रॅनबेरी ज्यूस उपयोगी पडू शकतात. मात्र, लक्षणे वाढल्यास डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.

Web Title: Burning sensation while urinating identify serious health warning signs through urine color before its too late

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • infections

संबंधित बातम्या

Health Care Tip: धाप लागण्यामागे फिटनेसची कमतरता की फुफ्फुसांचा आजार? जाणून घ्या शरीरसंबंधित आजाराचे संकेत
1

Health Care Tip: धाप लागण्यामागे फिटनेसची कमतरता की फुफ्फुसांचा आजार? जाणून घ्या शरीरसंबंधित आजाराचे संकेत

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
2

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली
3

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
4

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.