गॅस - ब्लोटिंगमुळे पोटात कायमच वेदना होतात? जेवणाआधी करा 'या पदार्थांचे सेवन, अपचनाच्या त्रासापासून मिळेल सुटका
गॅस – ब्लोटिंगची कारणे?
अपचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी उपाय?
बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी काय खावे?
दैनंदिन आहारात सतत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्यासंबंधित असंख्य समस्या उद्भवू लागतात. तिखट, तेलकट आणि अतिमसालेदार पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. बऱ्याचदा जेवणानंतर अनेकांना गॅस आणि ब्लोटिंगचा त्रास सुरु होतो. वाढत्या बद्धकोष्ठतेमुळे पोटात वेदना होणे, अपचन, अस्वस्थ वाटणे आणि जीव कासावीस झाल्यासारखे वाटते. शरीरात वाढलेल्या ऍसिडिटीमुळे संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. आतड्यांमध्ये साचून राहिलेल्या विषारी घाणीमुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स, मुरूम येऊन त्वचा निस्तेज होऊन जाते. जीवनशैलीतील धावपळीमुळे आणि आहारात सतत होणाऱ्या बदलांमुळे संपूर्ण आरोग्याला हानी पोहचते. वारंवार तुम्हाला अपचनाचा त्रास होत असेल तर वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे फार आवश्यक आहे. बद्धकोष्ठता किंवा ऍसिडिटी वाढल्यानंतर मेडिकलमधील गोळ्या आणून खाल्ल्या जातात.(फोटो सौजन्य – istock)
अपचन झाल्यानंतर मेडिकलमधील गोळ्यांचे सेवन केल्यास काहीकाळ फरक दिसून येतो, पण कालांतराने पुन्हा एकदा शरीरात ऍसिडिटीचे प्रमाण वाढते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गॅस – ब्लोटिंगच्या समस्येपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी जेवणाआधी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी घरगुती पदार्थांचा आहारात समावेश करावा. चला तर जाणून घेऊया सविस्तर.
गॅस, ब्लोटिंग आणि बद्धकोष्ठता वाढल्यानंतर अपचन, उलट्या, मळमळ आणि डोकेदुखीचा त्रास खूप जास्त वाढतो. अशावेळी स्वयंपाक घरातील आयुर्वेदिक पदार्थांचा आहारात समावेश करावा. जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम शरीरावर झाल्यामुळे आरोग्य बिघडते. त्यामुळे नेहमीच संतुलित आणि पौष्टीक आहार घेणे फार आवश्यक आहे. जेवणाआधी बारीक आल्याचा तुकडा घेऊन त्यावर काळे मीठ टाकून चावून खाल्ल्यास अनेक बदल दिसून येतील. यामुळे पोटातील बाईल ज्यूस आणि पॅन्क्रीॲटिक ज्यूस ॲक्टिव्ह होण्यास मदत होईल, ज्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतील. याशिवाय नियमित जेवणाआधी आलं चावून खाल्ल्यास तात्काळ फारक दिसून येईल आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल.
गॅस होणे, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता इत्यादी समस्या वाढू लागल्यास आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाण्याऐवजी तशीच साचून राहते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आल्याचा तुकडा चावून खाल्ल्यानंतर त्यावर कोमट पाणी प्यावे. यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते. याशिवाय आल्याचे सेवन केल्यामुळे भूक वाढते. मळमळ आणि उलट्यांच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी आल्याच्या रसात किंवा कच्चे आले चावून खाताना त्यावर काळे मीठ टाकावे. यामुळे लगेच फरक पडतो.
Ans: अनियमित आहार, जास्त तेलकट/तिखट अन्न, पचनशक्ती कमी असणे, लवकर-लवकर खाणे, कार्बोनेटेड पेये आणि ताणतणाव ही प्रमुख कारणे आहेत.
Ans: कोमट पाणी, जिरे पाणी, आले (आले-लिंबू), सौंफ (बडीशेप), ताक किंवा लिंबूपाणी यांचे सेवन केल्यास पचन सुधारते आणि गॅस कमी होतो.
Ans: पोट फुगणे, पोटात दुखणे, ढेकर येणे, जळजळ होणे, अपचन आणि अस्वस्थता ही सामान्य लक्षणे आहेत.






