'बटर गार्लिक नान'ला मिळाला जगातील सर्वोत्कृष्ट ब्रेडचा दर्जा, कुलच्यासह अन् भारतीय ब्रेड्सचाही समावेश; लिस्ट आली समोर
भारतीय खाद्यपदार्थांची चव जगप्रसिद्ध आहे. याचे मूळ वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक डिशमधील मसाल्याची चव, सुगंध आणि टेक्श्चर यांचा अनोखा संगम. भारतीय जेवणात वेगवगेळ्या ब्रेड्सना विशेष महत्त्व आहे. मग ती साधी घरगुती गव्हाची चपाती असूदेत किंवा रेस्टॉरंटमधील तंदुरी रोटी आणि नान असूदेत. भारतीय जेवणाची प्रत्येक थाळी ब्रेडशिवाय अपूर्णच वाटते. त्यातच आता भारताच्या याच ब्रेडने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली एक वेगळी ओळख बनवत सर्वोच्च स्थान पटकावल्याचे समोर आले आहे.
Travel: जगाच्या कोपऱ्यात वसलंय एक रहस्यमयी गाव, इथे जाताच गायब होतात लोक; सरकारनेही केलेत हात वर
फेमस फूड आणि ट्रॅव्हल गाईड TasteAtlas ने ‘जगातील टॉप 100 ब्रेड्स’ ची नवीनतम यादी शेअर केली आहे. ज्यामध्ये भारताच्या बटर गार्लिक नानला या यादीत प्रथम स्थान मिळाले, त्यानंतर आणखी एका भारतीय फ्लॅटब्रेड – अमृतसरी कुलचानेही या यादीत दुसरे स्थान पटकावले आहे. या यादीत भारताच्या अनेक ब्रेड्सचा समावेश आहे. चला तर मग या लिस्टमध्ये कोणकोणत्या भारतीय ब्रेड्सचा समवेश झाला आहे ते जाणून घेऊया.
बटर गार्लिक नान
बटर गार्लिक नान हा भारतीय फ्लॅटब्रेड आहे, जो आपल्या सॉफ्ट आणि फ्लेकी टेक्सचरसाठी ओळखला जातो. मैद्याच्या पिठापासून हा तयार केला जातो आणि गरम तंदूरमध्ये त्याला भाजले जाते. नंतर तयार नानवर लोणी किंवा तूप लावले जाते आणि त्यावर चिरलेला लसूण/कोथिंबीरही लावली जाते जे याची चव आणखीन वाढवतात.
अमृतसर कुलचा
कुलचा, तंदूरमध्ये बनवलेला मसालेदार फ्लॅटब्रेड आहे ज्याच्या आत बटाटा किंवा पनीरची स्टफिंग भरली जाते. अमृतसरी या उत्तर भारतातील एक प्रसिद्ध पदार्थ आहे.
कार्साम्बा पिडेसी
हे एक स्वादिष्ट तुर्की पाई आहे, याचे टेक्शचर फार मऊदार असते. हे खमीर पिठापासून बनवले जाते. याच्या आत बीफचा किमा आणि कांदे भरले जाते.
रोटी कॅनई
रोटी कॅनई एक पारंपारिक पॅन-फ्राइड फ्लॅटब्रेड आहे. हे पीठ वारंवार दुमडले जाते, ज्यामुळे त्याला एक फ्लेकी टेक्शचर येते. याच्या आतील थर मऊ आणि आवटर कवर कुरकुरीत असते.
पॅन दे बोनो
पॅन दे बोनो ही एक पारंपारिक ब्रेड आहे जी बॅगल्स किंवा बॉलच्या आकारात बनवले जाते. हे सहसा एक कप हॉट चॉकलेटसह गरम सर्व्ह केले जाते.
Chocolate Idli Recipe: लहान मुलं होतील खुश, अवघ्या 10 मिनिटांतच घरी बनवा चॉकलेट इडली
या यादीत बटर गार्लिक नान आणि अमृतसरी कुलचा सोबत एकूण 13 भारतीय रोट्यांचा समावेश आहे.