Skibidi...काय आहे हा नवा गोंधळ? Gen Z च्या डिक्शनरीत ॲड झाले काही नवीन शब्द (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Skibidi… ऐकून गोंळध उडाला ना? नेमका काय आहे हा शब्द? कुठून आला? कोणी शोधला असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. हा शब्द तुम्ही सोशल मीडियावरही पाहिला असेल. तसेच यांसारखे delulu, tradwife असेही इतर शब्द सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. तर हे शब्द Gen Z आणि Gen Alpha यांच्या सोशल मीडिया संस्कृतीतून आले आहे.
केंब्रिजने यांसारखे ६ हजार शब्द आणि वाक्यप्रचार डिक्शनरीमध्ये ॲड केले आहेत. सध्या याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. आज आपण या शब्दांचा नेमका अर्थ काय आहे हे जाणून घेणार आहोत.
डेटिंगच्या टर्म्समध्ये Gen Z चा अनोखा ट्विस्ट; ‘हे’ विविध प्रकार पाहून डोकं चक्रावून जाईल
सध्या या शब्दांवर सगळीकडे टीका केली जात आहे. काही लोकांनी आता “इंग्रजी भाषा ही भाषा राहिली नसून, टिकटॉकचे कमेंट सेक्शन बनले” असल्याचे म्हटले आहे.
डिक्शनरीमध्ये का अड केले हे शब्द?
केंब्रिज युनिव्हर्सिटीच्या मते, सध्या बदलत्या तंत्रज्ञानानुसार भाषेतही अनेक बदल होत आहे आणि हा बदल जपणे आवश्यक असल्याचे युनिव्हर्सिटीने म्हटले आहे.
आता तुम्हाला आणखी कोणते नवे शब्द माहित असतील तर ते आम्हालाही कळवा.