1997 ते 2012 या कालावधीत जन्माला आलेली मुलं ही Gen Z जनरेशन म्हणून ओळखण्यात येते. या जनरेशनमध्ये सोशल मीडियाची क्रेझ प्रचंड असून डेटिंगशी संबंधित अनेक नवीन टर्म्स देखील आहेत. तुम्ही, घोस्टिंग, ब्रेडक्रंबिंग, सिच्युएशनशिप यासांरख्या अनेक टर्म्स ऐकल्या असतील. आज आपण या टर्म्स बद्दल जाणून घेणार आहोत. (फोटो सौजन्य: iStock)
Gen z Dating Terms
नॅनोशिप - या डेटिंगप्रकारात दोन व्यक्ती अगदी कमी कालावधीसाठी एकत्र येतात. हे नाते एक-दोन आठवड्यांपुरते असते आणि कोणतीही कमिटमेंट न देता संपते.
पॉकेटिंग- या प्रकारात कपल्स आपले नाते सिक्रेट ठेवतात किंवा फक्त जवळच्या व्यक्तींनाच त्याची माहिती असते. नात्यावर बाहेरच्या लोकांची नजर नको म्हणून असे केले जाते
टेक्सटेशनशिप - यामध्ये दोन व्यक्ती फक्त सोशल मीडियावर एकमेकांशी बोलतात. प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांच्यात फारसे संभाषण होत नाही किंवा ते एकमेकांसोबत अनोळखी असल्यासारखे वागतात
ऑरबिटिंग - ऑरबिटिंग म्हणजे फक्त सोशल मीडियावर एखाद्याला सतत स्टॉक करणे. हे व्यक्तीचे पोस्ट्स बघून, लाईक करून किंवा स्टोरीज पाहून केले जाते, पण प्रत्यक्ष नातेसंबंध नसते
स्निटिंग - स्निटिंगमध्ये व्यक्ती फक्त फ्रीच्या जेवणासाठी एकत्र येतात. या प्रकारात कोणत्याही प्रकारचा रोमान्स किंवा भावनिक जोड नसतो
थ्रोनिंग- थ्रोनिंग प्रकारात कपल्स फक्त समोरच्या व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीला महत्त्व देऊन नातेसंबंध ठेवतात. हा प्रकार पैशासाठी बनवलेल्या नात्याला सूचित करतो
बेचिंग- या प्रकारात व्यक्ती रिलेशनशिपमध्ये असूनही दुसऱ्या व्यक्तीला बॅकअप ऑप्शन म्हणून ठेवतो. गरज वाटल्यास हा बॅकअप पर्याय वापरला जातो
ब्रेडक्रम्बिंग -या प्रकारात कपल्स एकमेकांसोबत फ्लर्ट करतात, एकमेकांना अटेन्शन देतात, पण कोणत्याही प्रकारे कमिटमेंट करत नाहीत
घोस्टिंग - घोस्टिंग म्हणजे अचानकपणे कोणताही संवाद न ठेवता नातेसंबंध तोडणे. यामध्ये कॉल्स, मेसेजेस, सगळे बंद करून व्यक्ती गायब होते
झॉम्बिइंग- झॉम्बिइंग म्हणजे घोस्टिंग केल्यानंतर काही काळाने अचानक परत येऊन पुन्हा संपर्क साधणे
लव्ह वॉम्बिंगमध्ये व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर अचानकपणे अतोनात प्रेमाचा वर्षाव करतो. सतत प्रेमाचे प्रदर्शन करून त्या व्यक्तीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो.