
चिकनगुनिया झाल्यानंतर मृत्यू होतो? गंभीर आजारांची लागण झाल्यानंतर दिसून येतात 'ही' लक्षणे, इनफेक्शन दूर करण्यासाठी उपाय
चिकनगुनियाची लक्षणे?
चिकनगुनिया कशामुळे होतो?
चिकनगुनियामुळे हाडांचे आरोग्य बिघडते का?
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आजारपण वाढू लागतात. सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू, मलेरिया किंवा इतर आजार होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. पावसाळ्यात चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ होते. चिकुनगुनिया झाल्यानंतर वेळीच लक्ष देणे फार आवश्यक आहे, अन्यथा जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. चिकुनगुनिया झाल्यानंतर शरीरात वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. पावसाळ्यातील दमट वातावरण, एडिस इजिप्ती आणि एडिस अल्बोपिक्टस डासांची पैदास, साचून राहिलेले पाणी इत्यादी कारणांमुळे चिकुनगुनिया होण्याची जास्त शक्यता असते. हा विषाणू डास चावल्यानंतर शरीरात थेट प्रवेश करतो. रुग्णाशेजारी बसल्याने, एकत्र जेवल्याने, पाणी प्यायल्याने किंवा काळजी घेतल्याने शरीराला चिकुनगुनियाची लागण होत नाही. चला तर जाणून घेऊया चिकुनगुनिया झाल्याने मृत्यू होतो का? चिकुनगुनियाची लक्षणे? जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
जिम ट्रेनर बनायचंय? ही महत्त्वाची कौशल्ये बाणावी लागतील तुमच्या अंगी! पाहून घ्या टिप्स आणि ट्रिक्स
नवजात बालके, वयोवृद्ध, गरोदर महिला आणि मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार असल्या व्यक्तींनी शरीरात दिसून येणाऱ्या कोणत्याही लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. अन्यथा शरीरसंबंधित आजारांचा धोका आणखीनच वाढू शकतो. चिकनगुनिया झाल्यानंतर शरीराची ताकद कमी होऊन जाते. कमी झालेली ऊर्जा वाढवण्यासाठी प्रोटीन, फळे, पालेभाज्या आणि इतर आवश्यक पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.
Ans: चिकनगुनिया हा संक्रमित एडिस (Aedes) डासांच्या चाव्यामुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. यामध्ये ताप, तीव्र सांधेदुखी आणि अंगदुखी ही प्रमुख लक्षणे दिसून येतात.
Ans: बहुतेक रुग्ण पूर्णपणे बरे होतात आणि मृत्यूचे प्रमाण अत्यंत कमी असते. मात्र वृद्ध व्यक्ती, लहान मुले किंवा आधीपासून गंभीर आजार असलेल्या व्यक्तींमध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता वाढू शकते. गंभीर लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Ans: या आजारासाठी विशिष्ट अँटीव्हायरल औषध उपलब्ध नाही. पुरेशी विश्रांती, भरपूर द्रवपदार्थ, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ताप आणि वेदनांसाठी औषधे घेणे तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम ठेवणे महत्त्वाचे आहे.