फोटो सौजन्य - Social Media
गर्भधारणा (Pregnancy) झाल्याचे संकेत बहुतेक महिलांना दुसऱ्या महिन्यात मिळतात, जेव्हा मासिक पाळी (Periods) येत नाही तेव्हा शंका येते आणि मग प्रेग्नंसी टेस्ट केली जाते. यासाठी घरी युरिन टेस्ट किंवा ब्लड टेस्ट केली जाते. अनेक महिला घरच्या घरी प्रेग्नंसी टेस्ट करतात आणि त्यावर विश्वास ठेवतात, तरी नंतर डॉक्टरकडून कन्फर्म करणे गरजेचे असते. आज मेडिकल सायन्समध्ये प्रेग्नंसी तपासण्यासाठी होम प्रेग्नंसी टेस्ट किट्स उपलब्ध आहेत, पण तरीही काही स्त्रिया पारंपरिक घरगुती उपाय वापरतात. अशाच उपायांपैकी एक आहे मीठ वापरून प्रेग्नंसी चाचणी. पण खरोखर मीठ वापरून गर्भधारणा समजू शकते का? पाहूया…
अशा पद्धतीने मीठाचा वापर करून प्रेग्नन्सी केली जाते:
या चाचणीसाठी पहाटेचा पहिला युरिन सॅम्पल, एक स्वच्छ वाटी आणि थोडेसे मीठ लागते. युरिनच्या वाटीत 2-3 चिमूट मीठ टाकून 5-10 मिनिटं वाट पाहायचं असतं. असं मानलं जातं की जर मिश्रणात दाटपणा किंवा फेस तयार झाला, तर टेस्ट पॉझिटिव्ह. काहीच फरक पडला नाही, तर टेस्ट नेगेटिव्ह मानली जाते.
काय आहे सत्यता?
गायनॅकोलॉजिस्ट्स आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, मीठाने प्रेग्नंसी टेस्ट करणं वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध नाही. हे फक्त एक स्वयंपाकघरातील गैरसमज आहे. गर्भधारणा झाली की शरीरात hCG नावाचा हार्मोन तयार होतो आणि त्याचे प्रमाण तपासण्यासाठीच युरिन टेस्ट किट्स वापरल्या जातात. मीठ यामध्ये काहीच भूमिका बजावत नाही.
गावांमध्ये किंवा लहान शहरांमध्ये, जिथे टेस्ट किट्स सहज मिळत नाहीत, तिथे महिला असे उपाय करतात. शिवाय सोशल मीडियावर किंवा युट्यूबवर असे व्हिडिओ पाहून लोक यात अधिक रस घेतात. मीठ वापरून प्रेग्नंसी टेस्ट करणं सोपं आणि स्वस्त वाटतं, पण हे अजिबात खात्रीशीर नाही. जर खरंच प्रेग्नंसीची शंका असेल, तर फार्मसीतून टेस्ट किट आणा किंवा डॉक्टरांशी संपर्क साधा आणि ब्लड टेस्टद्वारे खात्री करा.