CHAPATI (फोटो सौजन्य- PINTEREST)
आपल्या रोजच्या जेवणात चपाती हे असतेच. परंतु चपाती जर कडक असली तर खायला आवडत नाही. चपाती मुलायम तेव्हाच होतात जेव्हा पीठ व्यवस्थित मळलेला असेल. परंतु कधी कधी पीठ व्यवस्थित जर माळला असेल तरी सुद्धा चपाती मुलायम आणि सॉफ्ट होत नाही. आणि सॉफ्ट चपाती खायची इच्छा ही इच्छा बनून राहते. म्हणून एक अशी ट्रिक आहे ज्याने चपाती मुलायम बानू शकते. केवळ तुम्हाला २ गोष्टींची गरज लागेल. चला तर बघुयात कोणती ट्रिक आहे ती.
मुलायम चपाती साठी काय आहे ट्रिक?
१. मुलायम चपाती बनवण्यासाठी तुम्हाला चपातीचा पीठ मळताना थोडं मीठ आणि थोडी पिठी साखर टाकावं लागेल.
२. सगळ्यात आधी तुम्ही ताटात पीठ काढा.
३. आता यांच्यात एक चिमूट मीठ आणि एक चिमूट साखर टाका.
४. यानंतर पाणी टाकून पीठ मळून घ्या
५. पीठ मळून झाल्यानंतर सुटी कपड्याने झाकून ठेवा.
६. याने पीठ फर्मेंट होणार
७. साखर आणि मीठ घातल्याने मळलेल्या पिठाची पचनक्षमता देखील वाढते, म्हणजेच या पिठापासून बनवलेल्या चपाती सहज पचतात.
८. आता अर्ध्या तासानंतर जेव्हा तुम्ही या पिठाची चपाती बनवता तेव्हा चपाती मुलायम बनते.
या ट्रिक देखील येतील कामात
१. मुलायम चपाती बनवण्यासाठी पिठाला थंड्या पाण्याने मलण्याशिवाय कोमट पाण्याचा वापर करू शकता.
२. पिठाला मळताना एक चमचा गरम तेल टाकून सुद्धा पीठ मळू शकता. याने पीठ मुलायम मळल्या जाते आणि चपाती सॉफ्ट होते.
३. पिठलं मळल्यानंतर त्याला ओल्या कापडाने झाकून ठेवा. ओल्या सुती कापडाला १० मिंट पर्यंत झाकून ठेवल्याने मळलेला पीठ मुलायम होती आणि चपाती चांगली बनते.
४. चपाती चांगली बनली पाहिजे म्हणून पीठ मळताना थोडासा बेकिंग सोडा पण टाकू शकता.
६. अनेक लोक पिठात तूप मिसळून देखील पीठ मळतात. ज्याने चपाती मुलायम बनतात.