डॉ बाबासाहेब आंबेडकर सकाळच्या नाश्त्यात करायचे 'या' पदार्थांचा समावेश
दरवर्षी सगळीकडे 14 एप्रिलला मोठ्या जलौषात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरा केली जाते. बाबासाहेबांच्या कार्याची ख्याती संपूर्ण जगभरात पसरलेली आहे. त्यांना संविधानाचे निर्माते म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्यांनी देशासाठी लिहिलेल्या संविधानाचा वापर संपूर्ण देशभरात केला जात आहे. बाबासाहेब आंबेडकर हे समाजसुधारक, कायदेपंडित आणि भारतीय संविधानाचे प्रमुख आहेत. त्यांचे विचार जगण्याला प्रेरणा देतात, यशस्वी आयुष्य जगण्याची नवीन उमेद देतात. बाबासाहेबांनी दलितांसह उपेक्षित समुदायांच्या हक्कांसाठी लढा दिला. याशिवाय बाबासाहेबांनी महिलांना शिक्षणाचा हक्का दिला. बाबासाहेबांनी आपले आयुष्य दलित समाजाच्या जडणघडणीसाठी समर्पित केले होते. आज आम्ही तुम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांना नाश्त्यात कोणते पदार्थ खायला आवडतात, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ‘हे’ अनमोल विचार जीवन जगताना देतील प्रेरणा, जीवनात मिळेल यशाचा मार्ग
सर्वच घरांमध्ये जेवणातील पदार्थ बनवताना डाळ, भात, भाजी, चपाती इत्यादी अनेक चविष्ट पदार्थ बनवले जातात. जेवणात जर हे पदार्थ नसतील तर जेवण जेवल्यासारखे वाटतं नाही. बाबासाहेब आंबेडकर कधी कधी स्वतःच घरी जेवण बनवण्याचे. त्यांना जेवण बनवायला खूप आवडायचं. स्वतः बनवलेले जेवण सहज पचते आणि आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असते, असे बाबासाहेब म्हणायचे. याशिवाय त्यांना साधा वाफवलेला भात आणि मसूरची डाळ खायला खूप आवडायची.
पचनास हलके आणि आरामदायी पदार्थ म्हणजे दही चपाती आणि भाज्या. रोजच्या आहारात भाज्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. हंगामी भाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीर कायम निरोगी राहते. दही खाल्यामुळे शरीर थंड राहते. बाबासाहेबांना रोजच्या आहारात दही चपाती खायला खूप आवडायची. ते प्रामुख्याने शाहाकरी जेवण जेवत असतं.
Dinvishesh : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित; जाणून घ्या 31 मार्चचा इतिहास
सकाळच्या नाश्त्यात बाबासाहेब आंबेडकरांना चहा, पापड आणि बिस्किटे इत्यादी पदार्थ खायला खूप आवडत होते. बाबासाहेब हे शाहाकारी अन्नपदार्थ खाण्यास जास्त प्राधान्य देत होते. याशिवाय इतरांनी सुद्धा ही जीवनशैली स्वीकारावी अशी त्यांची इच्छा होते.
बाबासाहेब आंबेडकरांना समुद्री मासे खायला खूप आवडायचे. कोकणी पद्धतीने भरपूर कोकम आणि नारळ घालून बनवलेले ताजे मासे त्यांच्या अतिशय आवडीचे होते. या पद्धतीने मासे बनवल्यास चव अतिशय सुंदर लागते. बोंबलाची चटणी बाबासाहेबांना खूप जास्त आवडतं होती. ते त्यांच्या गटातील मित्रांसाठी अनेकदा माश्यांची मेजवानी बनवायचे. सुकवलेल्या बोंबीलचा वापर करून लोणचं देखील बनवले जायचे.