Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅन्सर- किडनी इन्फेक्शन झाल्यानंतर लघवीमध्ये दिसून येतात ‘हे’ गंभीर बदल, वेळीच सावध होऊन घ्या डॉक्टरांचा सल्ला

युरीन इन्फेक्शन झाल्यानंतर लघवीसंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे लघवीमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 11, 2025 | 05:30 AM
कॅन्सर- किडनी इन्फेक्शन झाल्यानंतर लघवीमध्ये दिसून येतात 'हे' गंभीर बदल

कॅन्सर- किडनी इन्फेक्शन झाल्यानंतर लघवीमध्ये दिसून येतात 'हे' गंभीर बदल

Follow Us
Follow Us:

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, मानसिक ताण, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव शरीरात निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. शरीरात होणाऱ्या बदलांकडे महिलांसह पुरुष सुद्धा दुर्लक्ष करतात. असे केल्यामुळे छोटे आजार गंभीर स्वरूप घेतात आणि संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. शरीरातील विषारी घटक लघवीवाटे आणि घामावाटे बाहेर पडून जातात. दिवसभरात बऱ्याचदा लघवीला जावे लागते. पण लघवीमध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. वारंवार लघवी होणे, लघवी करताना जळजळ किंवा वेदना होणे इत्यादी समस्या सामान्य समजून दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषध उपचार करणे आवश्यक आहे. लघवीत होणारे बदल आरोग्यासंबंधित गंभीर आजाराचे संकेत दर्शवतात.(फोटो सौजन्य – istock)

Breast Cancer: स्तन कर्करोगाच्या ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, खूप उशीर होण्यापूर्वी स्वतःला वाचवा

आरोग्यासंबंधित गंभीर आजाराची शरीराला लागण झाल्यानंतर शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. ज्यामुळे शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण झाल्यानंतर मधुमेह, कॅन्सर, उच्च रक्तदाब,किडनी इन्फेक्शन किंवा लिव्हरसबंधित समस्या उद्भवतात.आज आम्ही तुम्हाला लघवीमध्ये दिसून येणारे बदल कोणत्या आजाराची लक्षणे आहेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. शरीरात हे बदल दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

वारंवार लघवीला होणे:

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर वारंवार लघवीला होते. याशिवाय खूप जास्त तहान लागल्यामुळे पाण्याचे सेवन केले जाते. मात्र त्यानंतर वारंवार लघवीला जावे लागते. मधुमेह झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यास शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचते. केवळ मधुमेहामुळेच नाहीतर युरीन इन्फेक्शन झाल्यानंतर सुद्धा लघवीसंबंधित समस्या उद्भवू लागतात. यूटीआय इन्फेक्शन वाढण्यामागे अनेक कारण आहेत. अतिप्रमाणात चहा कॉफीचे सेवन, दारू जास्त प्यायल्यामुळे सतत लघवीला जावे लागते.

लघवीच्या रंगात बदल होणे:

डिहायड्रेशन, लिव्हर डिजीज, काविळ, जास्त घाम येणे किंवा विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे लघवीचा रंग अतिशय गडद होऊन जातो. लघवी करताना असह्य वेदना होतात. लघवीचा रंग जर लाइट किंवा पारदर्शक असेल तर डिहायड्रेशनची समस्या उद्भवते.तर काहीवेळा मधुमेह आणि किडनी निकामी झाल्यानंतर सुद्धा लघवीच्या रंगात अतिशय गंभीर बदल दिसून येतात.

रक्तात साचलेल्या Uric Acid मुळे सांध्यांमध्ये जळजळ होते? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, कटकट वाजणारी हाडे होतील मजबूत

लघवीतून रक्त येणे:

शरीरात युरीन इन्फेक्शन वाढल्यानंतर लघवीमधून काहीवेळा रक्त येते. लघवीतून रक्त येणे हे गंभीर आजाराचे लक्षण आहे. स्टोन, इन्फेक्शन किंवा किडनीच्या आजाराची लागण झाल्यानंतर लघवीमधून रक्त येते. याशिवाय कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतरसुद्धा लघवीमधून अचानक रक्त येणे.

FAQs (संबंधित प्रश्न)

लघवीच्या बदलांची प्रमुख कारणे:

बीटसारखे काही पदार्थ खाल्ल्यास लघवीचा रंग बदलू शकतो. काही औषधांमुळेही लघवीचा रंग गडद पिवळा होऊ शकतो. जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता असते, तेव्हा लघवी गडद पिवळी होते. पुरेसे पाणी प्यायल्यास लघवीचा रंग फिकट पिवळा किंवा अंबर रंगाचा होतो.

मूत्र संसर्ग म्हणजे काय?

युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) म्हणजे मूत्रमार्गाच्या कोणत्याही भागामध्ये होणारा संसर्ग, जो सामान्यतः जिवाणू, बुरशी किंवा विषाणूंमुळे होतो.

लक्षणे कोणती आहेत?

लघवी करताना जळजळ होणे किंवा वेदना होणे, वारंवार लघवीला जावे लागणे, पण लघवी कमी होणे, मूत्राशयात वेदना होणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Cancer after kidney infection these severe changes are seen in urine urine changes causes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issues
  • infections

संबंधित बातम्या

Pomogranate Benefits: सकाळी उठल्यानंतर नियमित करा वाटीभर डाळिंबाचे सेवन, रक्त शुद्ध होण्यासोबतच शरीर होईल डिटॉक्स
1

Pomogranate Benefits: सकाळी उठल्यानंतर नियमित करा वाटीभर डाळिंबाचे सेवन, रक्त शुद्ध होण्यासोबतच शरीर होईल डिटॉक्स

Health Update: रक्ताच्या एका थेंबामधून समजणार आता दोन आजार! दुर्गम भागांतही कमी खर्चात निदान आता शक्य
2

Health Update: रक्ताच्या एका थेंबामधून समजणार आता दोन आजार! दुर्गम भागांतही कमी खर्चात निदान आता शक्य

Sciatica Pain: सायटिकाची ‘ही’ लक्षणे दिसू लागल्यास अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कायमच राहाल अंथरुणाला खिळून
3

Sciatica Pain: सायटिकाची ‘ही’ लक्षणे दिसू लागल्यास अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा कायमच राहाल अंथरुणाला खिळून

Uric Acid: शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गभींर लक्षणे, सांध्यांमधील वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपाय
4

Uric Acid: शरीरातील युरिक ॲसिडची पातळी वाढल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गभींर लक्षणे, सांध्यांमधील वेदना कमी करण्यासाठी घरगुती उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.