Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पार्लरला जाण्यासाठी वेळ मिळत नाही? स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचा वापर केल्यास त्वचा राहील कायमच फ्रेश आणि ग्लोइंग

त्वचेच्या वाढत्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. यामुळे त्वचा अतिशय सुंदर आणि चमकदार राहते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 29, 2026 | 01:35 PM
पार्लरला जाण्यासाठी वेळ मिळत नाही? स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा वापर केल्यास त्वचा राहील कायमच फ्रेश आणि ग्लोइंग

पार्लरला जाण्यासाठी वेळ मिळत नाही? स्वयंपाक घरातील 'या' पदार्थांचा वापर केल्यास त्वचा राहील कायमच फ्रेश आणि ग्लोइंग

Follow Us
Follow Us:

चेहऱ्यावरील हरवलेली चमक वाढवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. पण वातावरणात सतत होणाऱ्या बदलांमुळे आणि वारंवार केमिकल प्रॉडक्टच्या वापरामुळे त्वचेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. चेहऱ्यावर पिंपल्स, मोठे मोठे फोड, सुरकुत्या किंवा बारीक मुरूम आल्यानंतर त्वचा निस्तेज होऊन जाते आणि त्वचेच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढतात. पण कामाच्या धावपळीमध्ये पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर करून त्वचेवरील ग्लो वाढवण्यासोबतच त्वचेची काळजी सुद्धा घेऊ शकता. स्वयंपाक घरात दही, मध, ओट्स, काकडी, कोरफड, बेसन, हळद, गुलाबपाणी, दूध तांदळाचे पीठ इत्यादी पदार्थ कायमच उपलब्ध असतात. या पदार्थांच्या वापरामुळे त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होते.(फोटो सौजन्य – istock)

महिनाभरात त्वचा होईल देखणी! चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी नियमित प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक, गणेशोत्सवात दिसाल सुंदर

त्वचेवरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी कायमच महागड्या केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. वाटीमध्ये दही, चिमूटभर हळद आणि गुलाबपाणी मिक्स करून तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावून ठेवल्यास त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यासोबतच धूळ, माती आणि अतिरिक्त तेल कमी होईल. गुलाब पाण्यात असलेले गुणकारी घटक त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करतात. तुमची त्वचा खूप जास्त कोरडी असेल तर दह्याच्या मिश्रणात मध किंवा दूध मिक्स करून लावू शकता. यामुळे चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी होईल आणि त्वचा मुलायम राहील. दही त्वचेमध्ये ओलसरपणा कायम टिकून ठेवतो. त्यामुळे फेसपॅक बनवताना दह्याचा वापर करावा.

संवेदनशील त्वचा असलेल्या महिलांनी कोणतेही स्किन केअर प्रॉडक्ट किंवा स्किन केअर रुटीन फॉलो करताना पॅच टेस्ट घ्यावी. पॅच टेस्ट घेतल्यामुळे कोणते प्रॉडक्ट किंवा पदार्थ त्वचेला सूट होतो की नाही हे समजून येईल. त्वचेमध्ये वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी काकडीचा रस, कोरफड जेल किंवा बटाटा वापरावा. उन्हामुळे निस्तेज झालेली त्वचा पुन्हा एकदा ताजी टवटवीत करण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. याशिवाय तांदळाचं पीठ, दही आणि मध इत्यादी पदार्थांचा लेप करून त्वचेवर लावल्यास त्वचा सॉफ्ट राहील. त्वचेवर खाज, जळजळ, लालसरपणा किंवा पुरळ जाणवत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

Hair Care: सकाळी की रात्री? केसांना तेल कधी लावावं? जाणून घ्या Hair Oiling ची योग्य वेळ

घरगुती पदार्थांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास पार्लरमध्ये जाण्याची किंवा महागड्या ट्रीटमेंट करण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्वचेची वरून काळजी घेण्यासोबतच आतून काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे भरपूर पाणी, पोषक आहार, पुरेशी झोप घ्यावी. याशिवाय उन्हात किंवा कुठेही बाहेर जाताना चेहऱ्यावर सनस्क्रीन लावावे. सनस्क्रीन लावल्यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण होते आणि टॅनिंग वाढत नाही. त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यासाठी घरगुती उपाय प्रभावी ठरतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्वयंपाकघरातील पदार्थांचा वापर त्वचेसाठी करता येतो का?

    Ans: होय, काही सामान्य पदार्थ त्वचेच्या काळजीसाठी वापरले जातात. मात्र प्रत्येकाची त्वचा वेगळी असल्याने कोणताही पदार्थ वापरण्यापूर्वी छोट्या भागावर पॅच टेस्ट करणे योग्य.

  • Que: घरगुती उपायांनी त्वचेला ग्लो मिळू शकतो का?

    Ans: नियमित त्वचास्वच्छता, पुरेसे पाणी, संतुलित आहार आणि योग्य मॉइश्चरायझिंगसोबत काही सौम्य घरगुती उपाय त्वचा निरोगी आणि ताजीतवानी दिसण्यास मदत करू शकतात.

  • Que: चेहऱ्यावर घरगुती फेसपॅक किती वेळ ठेवावा?

    Ans: फेसपॅकमधील घटकांनुसार वेळ बदलतो. साधारणपणे तो जास्त वेळ चेहऱ्यावर ठेवू नये आणि त्वचेवर जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवल्यास लगेच धुवून टाकावा.

Web Title: Cant find the time to visit a salon using these kitchen ingredients will keep your skin fresh and glowing at all times

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

महिनाभरात त्वचा होईल देखणी! चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी नियमित प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक, गणेशोत्सवात दिसाल सुंदर
1

महिनाभरात त्वचा होईल देखणी! चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी नियमित प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक, गणेशोत्सवात दिसाल सुंदर

पिंपल्स आणि ऑयली स्किनमुळे त्रस्त आहात? मग ‘या’ पद्धतीने करा गुलाब पाण्याचा वापर, त्वचेच्या समस्या होतील नष्ट
2

पिंपल्स आणि ऑयली स्किनमुळे त्रस्त आहात? मग ‘या’ पद्धतीने करा गुलाब पाण्याचा वापर, त्वचेच्या समस्या होतील नष्ट

Rakshabandhan: Glowing Skin मिळविण्यासाठी हजारो रुपयांची गरज नाही, घरीच करा नैसर्गिक फेशियल
3

Rakshabandhan: Glowing Skin मिळविण्यासाठी हजारो रुपयांची गरज नाही, घरीच करा नैसर्गिक फेशियल

केस खूप जास्त कोरडे झाले आहेत? मग दह्याचा वापर करून घरीच तयार करा हेअर मास्क, केस दिसतील सुंदर
4

केस खूप जास्त कोरडे झाले आहेत? मग दह्याचा वापर करून घरीच तयार करा हेअर मास्क, केस दिसतील सुंदर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.