फाटलेले ओठ सुधारण्यासाठी घरगुती उपाय
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. या दिवसांमध्ये शरीरावरील त्वचेसोबतच ओठांची त्वचा सुद्धा खराब होण्याची शक्यता असते. ओठ कोरडे झाल्यानंतर ते पुन्हा सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. कोरड्या ओठांची समस्या सगळ्यांचं उद्भवते. ओठ कोरडे झाल्यानंतर अनेकदा ओठांमधून रक्त येण्यास सुरुवात होते, याशिवाय ओठांना भेगा पडतात. ओठांवर सुरकुत्या आल्यानंतर ओठांवरील त्वचा कडक आणि रुक्ष होऊन जाते. ओठ फुटल्यानंतर ओठांना व्हॅसलिन किंवा इतर कोणत्याही क्रीम्स लावल्या जातात. मात्र ओठांवरील त्वचा अतिशय नाजूक असते. त्यामुळे ओठांना कोणतीही गोष्टी लावताना ती चांगल्या दर्जाची असावी.(फोटो सौजन्य – iStock)
टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘या’ फळाचा फेसपॅक नक्की करा ट्राय, त्वचा होईल गोरीपान
ओठांची काळजी घेण्यासाठी अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेले महागडे क्रीम्स, लिपबाम इत्यादी अनेक गोष्टी लावतात. मात्र त्याचा फारसा परिणाम ओठांवर दिसून येत नाही. अशावेळी तुम्ही घरगुती उपाय करून ओठांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला फाटलेल्या ओठांसाठी काही सोपे आणि घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास ओठांवरील त्वचा मुलायम होईल.
फाटलेले ओठ सुधारण्यासाठी घरगुती उपाय
ग्लोइंग त्वचेसाठी सतत गुलाबपाणी वापरता? मग जाणून घ्या त्वचेचे होणारे गंभीर नुकसान
फाटलेल्या ओठांची काळजी घेण्यासाठी ओठांना खोबेरील तेल लावणे आवश्यक आहे. रात्री झोपताना किंवा दिवसभरात कधीही तुम्ही ओठांना खोबरेल तेल लावू शकता. यामुळे तुमचे ओठ चांगले होतील. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी नियमित भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे शरीर हायड्रेट आणि निरोगी राहते. ओठांना तूप लावावे. तुपामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे फाटलेल्या ओठांसाठी तुपाचा वापर करावा. शरीरामध्ये विटामिन सी आणि बी ची कमतरता निर्माण झाल्यानंतर ओठ फुटतात. लिपस्टिक, लिप बाम, तसेच इतर ब्युटी प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा.