पपईचा फेसपॅक लावण्याचे फायदे
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. कोरड्या त्वचेवर कितीही उपाय केले तरीसुद्धा त्वचा कोरडीचं राहते. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी. त्वचा कोरडी झाल्यानंतर त्यावर मेकअप केल्यास त्वचा अधिकच खराब होऊन जाते. त्वचा कोरडी झाल्यानंतर अनेक महिला त्वचेवर बाजारात मिळणारे महागडे ब्युटी प्रॉडक्ट लावतात. यामुळे त्वचा सुंदर आणि चमकदार होण्याऐवजी अधिकच कोरडी होऊन जाते. चेहऱ्यावर चुकीच्या प्रॉडक्टचा वापर केल्यामुळे त्वचेमधील नैसर्गिक तेल कमी होते. याशिवाय त्वचेमधील ओलावा कमी होतो. त्यामुळे कोणत्याही केमिकल किंवा हर्बल प्रॉडक्टचा वापर करताना ते त्वचेला सूट होईल की नाही याची खात्री करून मगच वापरावे.(फोटो सौजन्य – iStock)
ग्लोइंग त्वचेसाठी सतत गुलाबपाणी वापरता? मग जाणून घ्या त्वचेचे होणारे गंभीर नुकसान
त्वचा कोरडी झाल्यानंतर त्यावर तुम्ही पपईचा फेसपॅक वापरू शकता. पपईमध्ये असलेले गुणधर्म त्वचेसाठी महत्वाचे आहेत. यामध्ये विटामिन सी, अँटीऑक्सिडेंट्स, विटामिन इ इत्यादी अनेक घटक आढळून येतात. पपईचा वापर त्वचेवर केल्यामुळे त्वचा हायड्रेट आणि ग्लोइंग दिसते. याशिवाय दुधामध्ये असलेले गुणधर्म त्वचा आतून उजळ्वण्यासाठी मदत करतात. त्यामुळे त्वचा गुळगुळीत आणि चमकदार होते. चला तर जाणून घेऊया फेसपॅक बनवण्याची सोपी कृती.
पपईचा गर
दूध
पपईचा फेसपॅक तयार करताना सर्वप्रथम, पपईचा गर काढून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात पपईचा गर आणि दूध टाकून बारीक पेस्ट तयार करून घ्या. तयार करून झाल्यानंतर वाटीमध्ये फेसपॅक काढून घ्या. तयार करून घेतलेला फेसपॅक संपूर्ण त्वचेवर लावून घ्या. संपूर्ण चेहऱ्यावर फेसपॅक लावून घेतल्यानंतर १५ मिनिटं फेसपॅक त्वचेवर तसाच ठेवा. 15 मिनिटानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे त्वचा सुंदर आणि मुलायम होईल. त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आठवड्यातून दोनदा तुम्ही पपईचा फेसपॅक लावू शकता.
Best Face Oil: चेहरा उजळण्यासाठी ‘हे’ ऑइल ठरेल बेस्ट, दिसाल अजूनच तरुण