महाराष्ट्राला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. राज्यात अनेक पर्यटस्थळे आहेत जी पाहण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्रात हजारो पर्यटकांची कूच होत असते. येथील अनेक सुंदर स्थळे अक्षरशः पर्यटकांना भुरळ घालत असतात. किल्ले म्हटलं की, अनेकांना रायगड, प्रतापगड या किल्ल्यांची आठवण येते मात्र तुम्हाला माहित आहे का? महाराष्ट्रात असाही एक साहसी किल्ला आहे, जिथे पर्यटक ट्रेकिंगचा मनसोक्त आनंद लुटू शकतात.
काय आहे किल्ल्याचे नाव?
या किल्ल्याचे नाव आहे वासोटा. हा किल्ला पुरातनकालीन असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात याला बांधण्यात आले होते. घनदाट जंगलातून आणि झाडाझुडपातून येथे जाण्याचा मार्ग आहे. मात्र इथे जाण्याची वेगळीच मजा आहे.
हजारो पर्यटकांसाठी पर्वणी
वासोटा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक महाराष्ट्रात येत असतात. इतिहासातही या किल्ल्याच्या महत्त्वाच्या नोंदी आहेत. त्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांनी वासोटा किल्ल्याचं नाव व्याघ्रगड असं ठेवलं होतं. शिवकालीन काळात या किल्ल्याचा वापर कैद्यांना इथे कैद करून ठेवण्यासाठी केला जात असे. कालांतराने याचे नाव व्याघ्रगडवरून वासोटा असे पडले.
किती वेळ लागतो?
वासोटा किल्ल्याचा प्रवास जवळपास 2 ते 3 तासांचा आहे. इथे पायी जावे लागते. पायी जाताना कितीही पाय थकले तरी इथले सौंदर्य पुढे जाण्यासाठी मनाला प्रेरित करत असतो. त्यामुळेच नैसर्गिक सौंदर्य आणि साहसाने भरलेला हा किल्ला कधीच ट्रेकर्सना निराश होऊ देत. म्हणूनच सध्या ट्रेकिंगसाठी हा किल्ला ट्रेकर्सचे मुख्य आकर्षण बनत चालले आहे.
वासोटा किल्ल्यावर कसे जावे?
वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी बामणोली इथून बोटीतून प्रवास करावा लागतो. कोयना धरणाच्या बॅक वॉटरमधून बोटिंग करत जाताना अत्यंत निसर्गमय सुंदर दृश्ये पाहायला मिळतात. बोटिंगनंतर किल्ल्याच्या दिशेने पायी प्रवास करावा लागतो. या किल्ल्याला जाण्यासाठीचा संपूर्ण प्रवास हा घनदाट जंगलांतून करावा लागतो. यावेळी रस्त्यात तुम्हाला काही जंगली प्राण्यांचेही दर्शनही घडू शकते.
[read_also content=”चारधाम यात्रेला जायचा प्लॅन आखताय? मग अशाप्रकारे करा ऑनलाईन रजिस्ट्रेशन नाही तर चेक पॉईंटवरूनच घरी पाठवतील https://www.navarashtra.com/lifestyle/if-you-are-planning-to-go-to-chardham-yatra-then-do-your-online-register-like-this-544241.html”]
मनमोहक दृष्यं
किल्ल्यावर पोहचताच तुम्हाला समोर मारुतीरायाचे दर्शन घडेल. किल्ल्यावरून दिसणारे मनमोहक दृष्यं तुम्हाला तुमचा सर्व थकवा विसरवून टाकण्यास भाग पाडतील. इथले विलोभनीय दृष्यं पाहून इथे पुन्हा येण्याची इच्छा मनात रुजू लागेल. वासोटा किल्ल्यावर मुक्कामाची परवानगी नसल्याने एका दिवसात हा ट्रेक करावा लागतो.
किल्यावर जाताना कोणती काळजी घ्यावी