
जगातील सर्वाधिक पाऊस भारताच्या या ठिकाणी होतो! निसर्गप्रेमींची पहिली पसंत आहे हे ठिकाण...
Travel News : हे आहे भारतातील सर्वात भयानक बीच, इथे असतो आत्म्याचा खुला वावर…
Nohkalikai Falls
चेरापूंजीतील सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे नोहकालिकाय धबधबा. हा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक मानला जाणारा धबधबा आहे. हा सुमारे १,१०० फूट उंचीवरून कोसळतो आणि एक मनमोहक दृश्य सादर करतो. पावसाळ्यात तर या ठिकाणाचे साैंदर्य आणखीनच खुलते. धबधब्याखालील निळे तळे हे पर्यटकांसाठी एक विशेष आकर्षण आहे.
Seven Sisters Falls
धबधबा व्यतिरिक्त इथले सेव्हन सिस्टर्स फाॅल्स देखील पर्यटकांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहे. इथे सात प्रवाहांचा सुंदर धबधबा पाहता येतो. पावसाळ्यात याची भव्यता आणखी वाढते. इथून टेकड्या आणि दऱ्यांचे विहंगम दृष्य पाहता येते.
Living Root Bridge
चेरापूंजीतील एक आणखी लोकप्रिय ठिकाण म्हणजे “लिविंग रूट ब्रिज”. हे जिवंत मुळांपासून बनवलेले पूल आहे. हे ब्रिज देखील अनेक पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. रबराच्या झाडांची मुळे वर्षानुवर्षे वाकवून आणि जोडून हे ब्रिज बनवण्यात आले आहे. स्थानिक जमातींच्या अद्भीत पारंपारिक तंत्राचे आणि निसर्गातील सामंजस्याचे हे एक उत्तम प्रतीक आहे. या ब्रिजपर्यंत जाण्यासाठी ट्रेकिंग करावी लागते. ट्रेकिंग करताना तुम्ही आजूबाजूच्या सुंदर दृष्यांचा अनुभव घेऊ शकता.
राजस्थानमध्ये लपलंय हिरवळीने भरलेलं ठिकाण, 100 आयलँडच्या नावाने प्रचलित
एकंदरीतच चेरापुंजी हे एक असे ठिकाण आहे जिथे तुम्हाला निसर्गाने बहरलेला परिसर पाहता येईल. येथील पाऊस, हिरवळ, धबधबे, गुहा आणि शांत वातावरण अनेकांचा थकवा दूर करुन एक चांगली आठवण मनात साठवून ठेवते. शहराच्या गजबटापासून दूर जर तुम्हाला शांततेत आपल्या कुटुंबासोबत किंवा प्रियजनांसोबत चांगला मोकळा वेळ घालवायचा असेल तर चेरापूंजी तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण ठरेल.