चिकू (Chiku) हे फळ जवळपास सगळ्यांनाच आवडतं. गोड, पिकलेला चिकू खूपच चविष्ट लागतो. तसेच तो आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यातून आपल्याला अनेकप्रकारची पोषकतत्व मिळतात. रोगप्रतिकारक्षमताही वाढते. चिकू केवळ आरोग्याला उपयोगी आहे असं नाही तर त्याची चवही मस्त असते. चिकूमध्ये अनेक गन असे आहेत जे शरीराला बळकट आणि निरोगी ठेवण्यात मदत करतात. चिकूमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात. सोबतच यात अँटीइंफ्लेमेटरी गुण असतात. पाहा कोणत्या समस्यांवर गुणकारी आहे चिकू.
चिकूतले मिनरल्स, कॅल्शिअम, फॉस्फरस, कॉपर आणि लोह हाडं मजबूत करण्यास मदत करते. आहारात कॉपर कमी झाले तर ऑस्टियोपोरोसिसचा धोका वाढू शकतो. चिकूमध्ये कॉपर असल्यानं तो हाडांच्या आरोग्यासाठी गरजेचा आहे.
चिकूमध्ये क आणि अ जीवनसत्व आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. यातून प्रतिकारशक्ती मजबूत बनते. शिवाय त्वचाही चांगली होते. सोबतच शरीराचं जीवाणू आणि विषाणूंपासून रक्षण होतं.
नेटमेड्सच्या एका रिपोर्टनुसार चिकूमध्ये अँटीपॅरासाईटिक, अँटीव्हायरल, अँटीइंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टरिअल गन असतात. यात खूप प्रमाणात फायबर असतं. चिकू अपचनापासून सुटका देतो. बद्धकोष्ठतेपासून दिलासा देत पोटाचं आरोग्य चांगलं राखतो.
त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य वाढवण्यास चिकू एक चांगलं फळ आहे. यात क, अ आणि ई जीवनसत्व असतं. यातून त्वचेत ओलावा राखला जातो. त्वचेच्या पेशी पुन्हा जिवंत होता. सोबतच रंगही उजळतो. वाढलेलं वय जाणवत नाही. त्वचेमध्ये चमक येते.
चिकू उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यात उपयोगी आहे. यात खूप प्रमाणात पोटॅशियम असतं. चिकू शरीरातील सोडियम कमी करतो. रक्तप्रवाह वाढवून रक्तदाबावर नियंत्रण ठेवतो.