खामेनेईंनंतर आता इराणच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा खात्मा! (Photo Credit- X)
महमूद अहमदीनेजाद यांनी २००५ ते २०१३ या काळात इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला होता. आपल्या कार्यकाळात त्यांनी अत्यंत कट्टर आणि पाश्चात्य विरोधी भूमिका घेतली होती. “इस्रायलला जगाच्या नकाशावरून पुसून टाकले पाहिजे,” असे वादग्रस्त विधान करून त्यांनी संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली होती. त्यांच्याच काळात इराणचा अणू कार्यक्रम वेगाने पुढे सरकला, ज्यामुळे इराण आणि पाश्चात्य देशांमधील, विशेषतः अमेरिकेसोबतचे संबंध विकोपाला गेले होते.
“Mahmoud Ahmadinejad, who served as Iranian president from 2005 until 2013, was k*lled in an Israeli-US airstrike, the Iranian Labor News Agency reported on Sunday. The strike hit Ahmedinejad’s residence in Narnak, northeast Tehran, k*lling him and several bodyguards, the… pic.twitter.com/WGXraO6LJk — Paul A. Szypula 🇺🇸 (@Bubblebathgirl) March 1, 2026
अहमदीनेजाद हे त्यांच्या पुराणमतवादी धोरणांसाठी प्रसिद्ध असले, तरी अलीकडच्या काळात त्यांनी युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणाची कडक शब्दांत निंदा करून जगाला चकित केले होते. इराणचे सध्याचे शासन रशियाच्या बाजूने उभे असताना, अहमदीनेजाद यांनी युक्रेनच्या सार्वभौमत्वाचे समर्थन केले होते. त्यांच्या या अनपेक्षित भूमिकेमुळे ते पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते.
सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई आणि आता महमूद अहमदीनेजाद यांसारख्या बलाढ्य नेत्यांच्या एकापाठोपाठ एक झालेल्या अंतामुळे इराणमध्ये नेतृत्वाचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. देशातील राजकीय आणि धार्मिक पोकळी भरून काढणे आता इराणसमोर मोठे आव्हान आहे. या नुकसानीचा बदला घेण्यासाठी इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’ने (IRGC) इस्रायल आणि अमेरिकेवर मोठ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांची धमकी दिली आहे.
खामेनेई आणि अहमदीनेजाद यांच्या मृत्यूचा सूड म्हणून इराणने अमेरिकेच्या ‘अब्राहम लिंकन’ (Abraham Lincoln) या युद्धनौकेवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा केला आहे. या घडामोडींमुळे मध्य पूर्वेतील तणाव आता सर्वोच्च पातळीवर पोहोचला असून, हे संकट जागतिक महायुद्धाकडे झुकते की काय, अशी भीती संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इराणच्या जनतेमध्ये सध्या संतापाचे वातावरण असून मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू आहेत.






