Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट करण्यासाठी कॉफी ठरेल वरदान! जाणून घ्या कॉफी वापरण्याची सोपी पद्धत

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी कॉफी मास्क किंवा कॉफीपासून बनवलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावावा. यामुळे त्वचा उजळदार आणि सुंदर होण्यास मदत होते. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 12, 2026 | 09:42 AM
त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट करण्यासाठी कॉफी ठरेल वरदान! जाणून घ्या कॉफी वापरण्याची सोपी पद्धत

त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट करण्यासाठी कॉफी ठरेल वरदान! जाणून घ्या कॉफी वापरण्याची सोपी पद्धत

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर चेहऱ्यावर टॅनिंग वाढून त्वचा काळी होऊन जाते. चेहऱ्यावर जमा झालेल्या डेड स्किनमुळे त्वचा खूप जास्त निस्तेज आणि थकल्यासारखी वाटते. सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं चहा कॉफी पिण्याची सवय असते. कॉफी प्यायल्याशिवाय अजिबात फ्रेश वाटत नाही. ब्लॅक कॉफी किंवा फिल्टर कॉफीचे आवर्जून सेवन केले. कॉफीचा वापर त्वचेसाठी सुद्धा केला जातो. कॉफीचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडेंट, कॅफीन आणि एक्सफोलिएटिंग गुणधर्म असल्यामुळे त्वचा सुंदर होण्यास मदत होते. त्वचेच्या असंख्य समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कॉफीचा वापर करावा. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चमचाभर कॉफीचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पद्धतीने कॉफीचा वापर केल्यास चेहऱ्यावर वाढलेली डेड स्किन नष्ट होऊन त्वचा उजळदार होईल.(फोटो सौजन्य – istock)

उन्हाळ्यात दिवसभर येणाऱ्या घामामुळे कंटाळा आहात? घामाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर

त्वचेसाठी वरदान कॉफी:

कॉफीमध्ये कॅफीक अ‍ॅसिड, क्लोरोजेनिक अ‍ॅसिड आणि पॉलीफेनॉल, अँटी-ऑक्सिडेंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. कॉफी शरीरासाठी जेवढी फायदेशीर ठरते तितकीच फायदेशीर त्वचेसाठी सुद्धा असते. त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर कायमच बाजारात उपलब्ध असलेले केमिकल युक्त स्किन केअर वापरण्याऐवजी घरगुती उपाय करून पाहावेत. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेची नैसर्गिक चमक कायम टिकून राहते आणि त्वचा सुंदर दिसते. कॉफीमध्ये असलेल्या कॅफ़िनमुळे त्वचेचा रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.

डेड स्किन नष्ट होते:

उन्हामुळे किंवा चेहऱ्यावर जमा झालेल्या घाणीमुळे डेड स्किन वाढल्यास ती घालवण्यासाठी कॉफीचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये कॉफी पावडर घेऊन त्यात खोबऱ्याचे तेल आणि मध मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर चेहऱ्यावर आणि मानेवर लावून हलक्या हाताने मसाज करावा. दोन ते तीन मिनिट मसाज केल्यामुळे त्वचेच्या समस्या कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर काहीवेळा तसाच ठेवून पाण्याने स्वच्छ त्वचा धुवून घ्या. यामुळे आठवडाभरात चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल.

निर्जीव त्वचेवर येईल ग्लो:

चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी कॉफी मास्क अतिशय फायदेशीर ठरेल. यामध्ये असलेले घटक त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करतात. कॉफीमधील अँटी-ऑक्सिडेंट निर्जीव त्वचा पुन्हा एकदा फ्रेश करतात. यासाठी वाटीमध्ये कॉफी पावडर घेऊन त्यात दही, हळद टाकून पेस्ट तयार करून घ्या. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तशीच ठेवून नंतर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवर जमा झालेली धूळ, माती आणि पिंपल्स कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ धुवून टाका. हळदीच्या वापरामुळे पिंपल्समध्ये जमा झालेली घाण स्वच्छ होईल.

प्रेग्नंसीनंतरच्या स्ट्रेच मार्क्सने हैराण झालात? महागडे प्रोडक्ट्स सोडा, हे घरगुती उपाय करतील तुमची मदत

बऱ्याचदा चेहऱ्यावर आलेल्या पिंपल्समुळे त्वचा सुजल्यासारखी वाटते. अशावेळी कॉफी मास्कचा वापर करावा. कॉफीमधील क्लोरोजेनिक अ‍ॅसिड चेहऱ्यावर आलेली सूज कमी करण्यास मदत करतात. यासाठी एक चमचा कॉफी मधात मिक्स करून लावावी. यामुळे चेहऱ्यावर आलेली सूज कमी होण्यासोबतच त्वचा फ्रेश दिसेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Coffee will be a boon to remove the dead skin accumulated on the skin learn the easy way to use coffee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 09:42 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

पिंपल्स आणि ऑयली स्किनमुळे त्रस्त आहात? मग ‘या’ पद्धतीने करा गुलाब पाण्याचा वापर, त्वचेच्या समस्या होतील नष्ट
1

पिंपल्स आणि ऑयली स्किनमुळे त्रस्त आहात? मग ‘या’ पद्धतीने करा गुलाब पाण्याचा वापर, त्वचेच्या समस्या होतील नष्ट

Rakshabandhan: Glowing Skin मिळविण्यासाठी हजारो रुपयांची गरज नाही, घरीच करा नैसर्गिक फेशियल
2

Rakshabandhan: Glowing Skin मिळविण्यासाठी हजारो रुपयांची गरज नाही, घरीच करा नैसर्गिक फेशियल

केस खूप जास्त कोरडे झाले आहेत? मग दह्याचा वापर करून घरीच तयार करा हेअर मास्क, केस दिसतील सुंदर
3

केस खूप जास्त कोरडे झाले आहेत? मग दह्याचा वापर करून घरीच तयार करा हेअर मास्क, केस दिसतील सुंदर

पावसाळ्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर कसा करावा? तज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत
4

पावसाळ्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर कसा करावा? तज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.