Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झोपल्यानंतर पायांमध्ये सतत गोळे येतात? संधिवात व हाडांचा त्रास वाढवण्यास कारणीभूत ठरतात जीवनशैलीतील ‘या’ चुका

रात्री झोपल्यानंतर पायांमध्ये वारंवार गोळे येत असतील तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. कारण शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता संपूर्ण आरोग्याला हानी पोहचवते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 29, 2026 | 08:31 AM
झोपल्यानंतर पायांमध्ये सतत गोळे येतात? संधिवात व हाडांचा त्रास वाढवण्यास कारणीभूत ठरतात जीवनशैलीतील 'या' चुका

झोपल्यानंतर पायांमध्ये सतत गोळे येतात? संधिवात व हाडांचा त्रास वाढवण्यास कारणीभूत ठरतात जीवनशैलीतील 'या' चुका

Follow Us
Follow Us:

पायांमध्ये सतत गोळे का येतात?
शरीरात कोणत्या विटामिनची कमतरता निर्माण झाल्यास पाय दुखतात?
मॅग्नेशियम वाढवण्यासाठी काय खावे?

धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. याचा थेट परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा रात्रीच्या वेळी झोपल्यानंतर पायांमध्ये गोळे किंवा पेटके येऊन पायांमध्ये खूप जास्त वेदना होतात. शरीरात निर्माण झालेली मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियमची कमतरता, शरीरातील पाण्याची कमतरता, स्नायूंचा थकवा किंवा मज्जासंस्थेचे आजार झाल्यानंतर शरीरात विविध लक्षणे दिसू लागतात. तासनतास एका जागेवर बसून काम करणे, शारीरिक हालचालींचा अभाव, दिवसभरात सतत काम करत राहिल्यामुळे शरीराच्या स्नायूंना आराम मिळत नाही. स्नायूंवर वाढलेल्या अतिरिक्त तणावामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. हाडांमध्ये वेदना वाढल्यानंतर बऱ्याचदा मेडिकलमधील गोळ्या औषध आणून खाल्ली जातात. पण याच गोळ्यांच्या सेवनामुळे शरीरावर दुष्परिणाम होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

पेडीक्युअर करण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याऐवजी टोमॅटोचा ‘या’ पद्धतीने करा वापर, पायावरील टॅनिंग होईल गायब

चुकीच्या गोळ्यांचे सेवन, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि वाढत्या कोलेस्टरॉलमुळे हाडे आणि स्नायूंमध्ये वेदना वाढू लागतात. ज्यावेळी पायांचे स्नायू अनैच्छिकरित्या आकुंचन पावतात आणि शिथिल होत नाहीत तेव्हा पायांमध्ये खूप जास्त गोळे येतात आणि वेदना वाढतात. ही समस्या प्रामुख्याने पायांच्या काफ मसल्समध्ये जाणवू लागते. वय वाढल्यानंतर स्नायूंमध्ये खूप जास्त वेदना वाढण्याची शक्यता असते. नसांमधील सिग्नलमध्ये होणारे बदल आणि शरीरात वारंवार होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे रात्रीच्या वेळी झोपल्यानंतर पायांमध्ये गोळे येतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

इलेक्ट्रोलाईट्स आणि खनिजांची कमतरता:

उन्हाळ्यासह इतर कोणत्याही ऋतूंमध्ये शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. आवश्यक घटक आणि इलेक्ट्रोलाईट्स, खनिजांची कमतरता निर्माण झाल्यानंतर स्नायूंवर परिणाम होतो. त्यामुळे स्नायूंना आराम देण्यासाठी मॅग्नेशियमची फार आवश्यकता असते. स्नायूंच्या आकुंचनासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. पण रक्तात निर्माण झालेली कॅल्शियमची कमतरता हाडांमधील वेदना वाढवते. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर हाड आणि स्नायूंमध्ये वेदना वाढतात. त्यामुळे नियमित भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याच्या कमतरतेमुळे रक्तभिसरणात अडथळे निर्माण होतात.

मधुमेह:

शरीरसंबंधित अतिशय गंभीर आजार म्हणजे मधुमेह. हा आजार झाल्यानंतर आयुष्यभर गोळ्या औषधांचे सेवन करावे.मधुमेह हा कधीच बरा न होणारा आजार आहे. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर पायांना स्नायूंना इजा पोहचण्याची जास्त शक्यता असते. पायांच्या नसांना इजा झाल्यामुळे झोपल्यानंतर पायात खूप जास्त गोळे येतात. याशिवाय रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची औषधांमुळे सुद्धा पायांमध्ये वेदना होण्याची जास्त शक्यता असते.

‘क्षयरोगमुक्त भारत’ साठी १०० दिवसांचा उपक्रम सुरू! कमकुवत रोगप्रतिकारकशक्ती असल्यास वाढू शकतो क्षयरोगचा धोका

आराम मिळवण्यासाठी कोणते उपाय करावेत:

स्नायूंमध्ये वाढलेला तणाव आणि थकवा कमी करण्यासाठी गोळा आल्यावर पाय सरळ करून समोरच्या दिशेने ओढावा. यामुळे पायाचे स्नायू ताणले जातात. तसेच वारंवार पायांमध्ये वेदना होत असतील तर गरम पाण्यात मीठ टाकून पाय शेकवावे. यामुळे रक्तभिसण सुधारण्यास मदत होते. तसेच रक्तभिसरण सुरळीत चालू ठेवण्यासाठी झोपताना पायाखाली उशी ठेवावी. दिवसभरात ३ लिटर पाणी आणि संतुलित आहार घेतल्यास स्नायूंमध्ये वाढलेल्या वेदना कमी होण्यास मदत होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: झोपल्यानंतर पायात गोळे का येतात?

    Ans: झोपेत पायात गोळे येण्याची मुख्य कारणे म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता, कॅल्शियम/मॅग्नेशियमची कमतरता, किंवा चुकीची जीवनशैली.

  • Que: पायात गोळे येणे संधिवाताशी संबंधित आहे का?

    Ans: होय, काही वेळा संधिवात किंवा सांध्यांच्या समस्यांमुळे पायात वेदना आणि गोळे येऊ शकतात.

  • Que: पायात गोळे येणे टाळण्यासाठी काय करावे?

    Ans: पुरेसे पाणी प्या, नियमित व्यायाम करा, स्ट्रेचिंग करा आणि संतुलित आहार घ्या.

Web Title: Constant cramps in legs after sleeping these lifestyle mistakes contribute to the development of arthritis and bone problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 08:31 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • vitamin deficiency

संबंधित बातम्या

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली
1

Health Update: शस्त्रक्रियेत मज्जातंतूंवर नजर; इजा होताच इशारा! पालिका रुग्णालयांत अत्याधुनिक ‘नर्व्ह मॉनिटरिंग’ प्रणाली

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ
2

Colorectal Cancer: आतड्यांच्या कॅन्सरपासून कायमच राहाल लांब! रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्या आणि फळांचा समावेश, शरीर राहील स्वच्छ

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती
3

Health Update: Ovarian Cyst म्हणजे कॅन्सर नाही? रजोनिवृत्तीपूर्वी अंडाशयातील गाठींबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे
4

Salt Water Bath: मीठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचा का वाढतोय ट्रेंड? जाणून घ्या शरीर आणि त्वचेला होणारे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.