गुडघे दुखीपासून आराम मिळवण्यासाठी 'या' पदार्थांचे करा सेवन
धावपळीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याकडे व्यवस्थित लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. सतत कामाचा तणाव, अपुरी झोप, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, जंक फूडचे सेवन इत्यादी गोष्टीमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे कमी वयातच आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवू लागतात. व्य वाढल्यानंतर हळूहळू हात पाय दुखणे, हाडांची घनता कमी होणे, सांध्यांचे दुखणे, ऑस्टिओपोरोसिस इत्यादी हाडांसंबंधित समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर खाली बसताना, वर उठताना, चालताना गुडघ्यांमध्ये वेदना होण्यास सुरुवात होते. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. आहारात पोषक घटकांची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आहारात बदल करून आरोग्याची काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
रोजच्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करावे, ज्यामुळे शरीराला पोषण मिळेल. दूध, दही, ताक, आणि चीज इत्यादी पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम आढळून येते. रोजच्या आहारात दुधाचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. या पदार्थांच्या सेवांमुळे हाडे मजबूत होतात आणि सांध्यांमधील घर्षण कमी होतो. त्यामुळे रोजच्या आहारात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी दुधाचे सेवन करावे.
हिवाळ्यामध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर पालेभाज्या उपलब्ध असतात. पालेभाज्यांच्या सेवांमुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पालक, मेथी, कोथिंबीर, मुळा, लाल माठ इत्यादी प्रकारच्या भाज्या बाजारात उपलब्ध असतात. शिवाय दिवसांमध्ये बाजारात मोहरीच्या पानांची भाजी मिळते. या पानांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि विटामिन के इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे हाडांना पोषण मिळते आणि सांधे दुखीचा त्रासापासून सुटका मिळण्यास मदत होते.
दैनंदिन आहारात सालीच्या धान्यांचे सेवन करावे. धान्यांच्या पिठापासून तयार केलेली चपाती किंवा भाकरी नेहमी आहारात खावी. जव, बाजरी, रागी, आणि ओट्स इत्यादी धान्यांमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आढळून येते. आहारामध्ये कॅल्शियम वाढवण्यासाठी नाचणीच्या भाकरीचे नियमित सेवन करावे. यामुळे हाडांच्या आरोग्यासोबतच पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
कॅल्शियम वाढवण्यासाठी संत्री, मोसंबी, आणि लिंबू इत्यादी फळांचे सेवन करावे. कॅल्शियम सोबतच या फळांमध्ये विटामिन सी सुद्धा मुबलक प्रमाणात आढळून येते. विटामिन सी शरीराला कोलॅजन निर्मितीसाठी आवश्यक ती मदत करते. हाडं आणि सांधे दुखीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आहारात संत्र्याचे सेवन करावे. यामुळे शरीराला कॅल्शियम मिळते.