Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आतड्यांमध्ये चिकटून राहिलेला विषारी मल बाहेर पडून जात नाही? मग उपाशी पोटी नियमित खा ‘हे’ पदार्थ, बद्धकोष्ठता होईल मुळांपासून नष्ट

आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांची हालचाल सुलभ राहते.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 17, 2025 | 05:30 AM
आतड्यांमध्ये चिकटून राहिलेला विषारी मल बाहेर पडून जात नाही? मग उपाशी पोटी नियमित खा 'हे' पदार्थ

आतड्यांमध्ये चिकटून राहिलेला विषारी मल बाहेर पडून जात नाही? मग उपाशी पोटी नियमित खा 'हे' पदार्थ

Follow Us
Close
Follow Us:

बद्धकोष्ठता होण्याची कारणे?
पचनक्रिया सुधारण्यासाठी कोणते पदार्थ खावेत?
आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी उपाय?

धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, जंक फूडचे अतिसेवन, सतत तिखट आणि तेलकट पदार्थ खाणे, पोषक घटकांचा अभाव, पाण्याची कमतरता आणि अपुऱ्या झोपेमुळे संपूर्ण शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. पचनक्रिया बिघडल्यानंतर शरीराला खूप जास्त हानी पोहचते. वारंवार पोटात गॅस होणे, ऍसिडिटी, मळमळ, उलट्या, आंबट ढेकर इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय थंडीच्या दिवसांमध्ये पचनक्रिया बिघडल्यानंतर पोट साफ न होणे, शौचास जोर लावावा लागणे, पोटात दुखणे आणि दिवसभर पोटात जडपणा वाटणे इत्यादी गंभीर लक्षणे दिसू लागतात. कारण वातावरणातील गारव्यामुळे कमीत कमी प्रमाणात पाण्याचे सेवन केल्यामुळे आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तशीच साचून राहते, ज्याचा आरोग्यावर परिणाम होतो.(फोटो सौजन्य – istock)

शर्लिन चोप्राने घेतला ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकण्याचा निर्णय! Breast Implants काढून टाकल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘हे’ महाभयंकर

काहींना जेवल्यानंतर लगेच झोपण्याची सवय असते. पण ही सवय शरीरासाठी अतिशय घातक ठरते. लगेच झोपल्यामुळे शरीरात अन्न पचन होण्याऐवजी तसेच साचून राहते. अन्नाचे कण साचून राहिल्यामुळे पोटात वेदना होणे, अपचन आणि आंबट ढेकर येण्याची जास्त शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पदार्थांमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुधारून आतड्यांची हालचाल कायमच सुलभ राहील. थंडीच्या दिवसांमध्ये शरीर निरोगी ठेवण्यासाठी घरगुती उपाय प्रभावी ठरतात.

पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन:

थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्याचे सेवन करावे. कोमट पाण्याचे सेवन केल्यामुळे आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाण्यास मदत होईल. कोमट पाण्याच्ये सेवनामुळे आतड्यांची हालचाल वाढते आणि पोट मोकळे होऊन शरीरातील घाण बाहेर पडून जाते. थंडीच्या दिवसांमध्ये फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. फायबर युक्त पदार्थ शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकतात. ओट्स, मुगाची खिचडी, गाजर, बीट, सफरचंद, पपई, केळी, हिरव्या भाज्या आणि सूप इत्यादी पदार्थांचे सेवन केल्यास शरीर कायमच निरोगी राहील. रात्रीच्या जेवणात मसालेदार, तेलकट आणि पचनास जड असलेल्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये.

आतड्यांमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आलं–जिरे–ओवा इत्यादी पदार्थांपासून बनवलेला काढा प्यावा. एका टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर पाण्यात जिरं, ओवा आणि किसलेले आलं घालून पाणी उकळवून घ्या. १५ मिनिटं मंद आचेवर काढा शिजवून झाल्यानंतर गॅस बंद करा. तयार केलेला काढा गाळून सेवन करावे. उपाशी पोटी काढा प्यायल्यास आतड्यांमधील घाण बाहेर पडून जाईल. कोमट पाण्यातून जिरं आणि ओव्याचे सेवन केल्यास आतड्यांची हालचाल सुलभ राहील आणि शरीर डिटॉक्स होईल.

मासिक पाळी येण्याआधी सतत चिडचिड होऊन रडू येत? ‘या’ कारणांमुळे शरीरात दिसून येतात गंभीर बदल, वेळीच लक्षणे ओळखून घ्या काळजी

थंडीत शरीराची पचनक्रिया मंदावते. त्यामुळे नियमित सकाळी उठल्यानंतर १०–१५ मिनिटे चालणे, हलका स्ट्रेचिंग, पोटाभोवती मसाज करावा. यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाण्यासोबतच वाढलेले वजन कमी होते. बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि शौचास जोर लावण्याच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती पदार्थांचे सेवन करावे. पोट व्यवस्थित स्वच्छ झाल्यास संपूर्ण दिवस आनंदात जाईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: बद्धकोष्ठता म्हणजे काय?

    Ans: बद्धकोष्ठता म्हणजे शौचास त्रास होणे, शौचास कमी वेळा होणे किंवा शौच करताना जोर द्यावा लागणे

  • Que: बद्धकोष्ठतेवर उपचार काय आहेत?

    Ans: अधिक फायबर असलेले पदार्थ खा.दिवसभर भरपूर पाणी पिणे महत्त्वाचे आहे.

  • Que: बद्धकोष्ठता का होते?

    Ans: फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांसारख्या फायबरयुक्त पदार्थांचे सेवन कमी असणे.

Web Title: Toxic faeces stuck in the intestines do not pass out then eat this food regularly on an empty stomach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • constipation home remedies
  • gut health
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

जास्त वेळ लघवी रोखून धरण्याची सवय शरीरासाठी ठरते जीवघेणी! किडनीसंबंधित उद्भवू शकतात ‘हे’ गंभीर आजार
1

जास्त वेळ लघवी रोखून धरण्याची सवय शरीरासाठी ठरते जीवघेणी! किडनीसंबंधित उद्भवू शकतात ‘हे’ गंभीर आजार

राज्यात किडनी रुग्णांना दिलासा! डायलिसीसच्या सोयीमुळे रुग्णांना स्थानिक पातळीवर उपचाराची मिळणार सुविधा
2

राज्यात किडनी रुग्णांना दिलासा! डायलिसीसच्या सोयीमुळे रुग्णांना स्थानिक पातळीवर उपचाराची मिळणार सुविधा

सकाळी उठल्यानंतर पोटात सतत आवाज येतो? पचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स
3

सकाळी उठल्यानंतर पोटात सतत आवाज येतो? पचनाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

वाढत्या स्क्रीन टाईमचा लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम! मोबाइलपासून दूर ठेवण्यासाठी या टिप्स करा फॉलो
4

वाढत्या स्क्रीन टाईमचा लहान मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम! मोबाइलपासून दूर ठेवण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.