जास्वंदीच्या पानांमध्ये आढळून येणारे गुणधर्म
बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप, जंक फूडचे सेवन, धूम्रपान इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. काहींना सतत तेलकट आणि तिखट पदार्थ खाण्याची सवय असते. पण नेहमी नेहमी या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्य बिघडून जाते. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. शरीराच्या नसांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर साचून राहतो. ज्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन जातात. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयींनमध्ये बदल करून आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. शिवाय घरगुती उपाय करून सुद्धा कोलेस्ट्रॉल कमी करता येतो.(फोटो सौजन्य-istock)
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
जास्वंदीचे फुल गणपती बाप्पाला खूप आवडते. शिवाय या फुलाचा वापर इतर धार्मिक कामांमध्ये केला जातो. जास्वंदीचे फुल आरोग्यसाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. या फुलाचा वापर करून चहा बनवला जातो. शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी तुम्ही जास्वंदीच्या फुलाचा चहा बनवून पिऊ शकता. यामुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होईल आणि आराम मिळेल. आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी जास्वदींच्या फुलाचा चहा कसा बनवावा? या चहाचे आरोग्याला काय फायदे होतात? जाणून घेऊया सविस्तर.
लाल रंगाचे जास्वंदीचे फुल,पान आरोग्यासाठी महत्वाचे आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स, विटामिन सी आणि हायड्रॉक्सी कोलिक ॲसिडसारखे पोषक घटक आढळून येतात. शरीरात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी जास्वंदीच्या फुलांचा चहा बनवून प्यावा. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल. यामध्ये आढळून येणारे पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. यामुळे शरीराच्या रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात.
जास्वंदीच्या फुलांचा चहा बनवण्यासाठी टोपात पाणी गरम करायला ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात 4 ते 5 जास्वंदीची फुले टाकून व्यवस्थित उकळवून घ्या. पाण्याचा रंग लाल झाल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. तयार केलेला चहा तुम्ही दिवसभरातून दोन ते तीन वेळा पिऊ शकता.
लाईफ स्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
शरीरात वाढलेली खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी आहारात कमीत कमी तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन करावे. ज्यामुळे आरोग्याचे कोणतेही नुकसान होणार नाही. या फुलांच्या चहाने शरीरातील लोहाची कमतरता दूर होते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. पोटात साचून राहिलेले विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी जास्वंदीचा चहा अतिशय गुणकारी आहे. यामुळे हृदयविकाराचा धोका टाळतो. शिवाय आरोग्य सुधारते.