Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोटातील गॅस कमी करण्यासाठी सकाळी उपाशी पोटी करा ‘या’ हिरव्या पदार्थाचे सेवन, पोट होईल क्षणार्धात स्वच्छ

बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी वेलदोड्याच्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील विषारी घाण बाहेर पडून जाते. जाणून घेऊया शरीराला होणारे इतरही फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 18, 2025 | 01:34 PM
पोटातील गॅस कमी करण्यासाठी सकाळी उपाशी पोटी करा 'या' हिरव्या पदार्थाचे सेवन

पोटातील गॅस कमी करण्यासाठी सकाळी उपाशी पोटी करा 'या' हिरव्या पदार्थाचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

रोजच्या आहारात बदल झाल्यानंतर पचनसंस्था बिघडते. तेलकट तिखट पदार्थांचे अतिसेवन, जंक फूड खाणे, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम पचनक्रियेवर होण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पचनक्रिया बिघडल्यानंतर पोटात गॅस होणे, अपचन झाल्यासारखे वाटणे, गॅस होणे, पोट फुगणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे वेलदोडे. वेलदोड्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. पचनक्रिया बिघडल्यानंतर वेलदोड्याच्या पाण्याचे सेवन करावे. हे पाणी शरीरासाठी प्रभावी आहे.(फोटो सौजन्य – iStock)

आंघोळ करताना चुकूनही करू नका ‘या’ चुका! फायदे होण्याऐवजी होईल आरोग्याचे नुकसान, वाढले हार्ट अटॅकचा धोका

वेलदोड्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. याशिवाय यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळून येतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक आरोग्यासाठी हानिकारक आहेत. हे विषारी घटक बाहेर पडून न गेल्यामुळे पचनक्रिया बिघडते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला वेलदोड्याचे पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

पचनक्रिया सुधारते:

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी वेलदोड्याचे पाणी प्यायल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. अपचन, गॅस, ऍसिडिटी इत्यादी अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी वेलदोड्याचे पाणी प्यावे. या पाण्याचे नियमित सेवन केल्यास पचनसंस्था निरोगी राहते आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवत नाही.

शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातात:

शरीरात साचून राहिलेली विषारी घटक आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामुळे पचनसंस्था बिघडण्यासोबत आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित वेलदोड्याचे पाणी प्यावे. वेलदोड्याचे पाणी प्यायल्यामुळे यकृताचे कार्य सुधारते आणि शरीरातील रक्तशुद्ध होण्यास मदत होते. त्यामुळे नियमित तुम्ही वेलदोड्याच्या पाण्याचे सेवन करू शकता.

रक्तदाब नियंत्रणात राहतो:

शरीरात वाढलेला उच्च रक्तदाब शरीराला हानी पोहचवतो. वेलदोड्यांमध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स घटक आढळून येतात, ज्यामुळे शरीराचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. या पाण्याचे सेवन केल्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते. वेलदोड्याचे पाणी प्यायल्यामुळे शरीरात वाढलेला कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतो.

शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात करा ‘या’ चटणीचे सेवन, रक्तवाहिन्या होतील स्वच्छ

तणाव कमी होतो:

शारीरिक आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र तरीसुद्धा तणाव कमी होत नाही. वाढलेला तणाव कमी करण्यासाठी नियमित वेलदोड्याचे पाणी प्यावे. या पाण्याच्या सेवनामुळे मानसिक तणाव कमी होतो. त्यामुळे झोपण्याआधी वेलदोड्याच्या पाण्याचे सेवन करावे.

टीप –  हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Consume this green food on an empty stomach in the morning to reduce gas in the stomach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 01:34 PM

Topics:  

  • health care news
  • Healthy Drinks
  • Improves digestion

संबंधित बातम्या

वाईन पिणे खरंच आरोग्यासाठी चांगली आहे का? जाणून घ्या यामागील सविस्तर कारणे
1

वाईन पिणे खरंच आरोग्यासाठी चांगली आहे का? जाणून घ्या यामागील सविस्तर कारणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.