श्रावण महिन्यात न चुकता करा 'या' हिरव्या पानाचे सेवन
आषाढ महिना संपून नुकतीच श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे.या महिन्यात भगवान शंकराची मनोभावे पूजा करून उपवास केला जातो. तसेच पूजा करताना भगवान शंकराला बेलाची पाने वाहिली जातात. बेलाची पाने धार्मिक विधींसाठी अतिशय महत्वाची मानली जातात. बेलाचे पान भक्तीचे प्रतीक मानले जाते. धार्मिक विधींमध्ये वापरले जाणारे बेलाचे पान आरोग्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचे आहे. कारण या पानामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी मदत करतात. बेलाच्या पानांमध्ये जीवनसत्त्वे अ, ब१, ब६ आणि क मोठ्या प्रमाणावर आढळून येते.(फोटो सौजन्य – istock)
बेलाची पाने आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. कॅल्शियमयुक्त गुणधर्मांनी समृद्ध असलेले बेलाचे पान शरीरसंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी मदत करेल.पचन, मधुमेह, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. आज आम्ही तुम्हाला उपाशी पोटी नियमित बेलाचे पान चावून खाल्यास शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. बेलाचे पान केवळ पूजेसाठीच नाहीतर आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आणि फायदेशीर ठरते.
रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे किंवा गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. पण सकाळी उठल्यानंतर नियमित बेलाचे एक पान चावून खाल्यास रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात राहील आणि मधुमेहाची समस्या उद्भवू नाही. उच्च रक्तदाबाच्या समस्येनी त्रस्त असलेल्या लोकांनी नियमित एक बेलाचे पान उपाशी पोटी चावून खावे. नैसर्गिकरित्या रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी बेलाची पाने अतिशय प्रभावी ठरतात.
दैनंदिन आहारात सतत तेलकट किंवा तिखट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. आतड्यांमध्ये विषारी घटक तसेच साचून राहिल्यामुळे गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवू लागतात. अशावेळी एक बेलाचे पान खाल्ल्यास शरीरात साचलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. शरीरातील घाण बाहेर पडून गेल्यानंतर पोट हलके वाटून आरोग्यासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवत नाहीत.
आतड्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी बेलाच्या पानाचे सेवन करावे. बेलाचे पान आतड्यांमध्ये चिकटलेली घाण स्वच्छ करण्यासाठी मदत करते. बेलाच्या पानामध्ये अँटीमायक्रोबियल आणि दाहशामक गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे आतड्यांमध्ये असलेली सूज किंवा विषारी घटक बाहेर पडून जाण्यास मदत होते.
बेलची पाने कशी वापरायची?
बेलपत्र वाळवून पावडर बनवून वापरता येते. बेलपत्राचा काढा बनवून पिऊ शकतो. बेलपत्रा खाण्यापूर्वी, विशेषतः मधुमेही रुग्णांनी, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
बेल पानांचे फायदे:
बेलाची पाने पचन सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, आम्लता आणि अपचन यासारख्या समस्या कमी होतात. बेलपत्र रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते आणि मधुमेहींसाठी फायदेशीर ठरू शकते. बेलपत्र हृदय निरोगी ठेवण्यास आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.