कांदा आणि लसणाच्या सेवनाचे फायदे (फोटो- istockphoto )
Health News: आपण आपल्या रोजच्या आहारात अनेक पदार्थांचा समावेश करत असतो. रोजचे पदार्थ तयार करताना असताना त्यात काही मसाले, किंवा काही पदार्थ मिसळणे हे अत्यंत महत्वाचे असते. तसेच आपल्या रोजच्या जेवणात कांदा आणि लसूण या दोन गोष्टींचा समावेश असतो. भारतीय जेवणांमध्ये यांचे महत्वाचे स्थान आहे. याशिवाय जेवण करणे ही कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. भाजी, वरण, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांमध्ये याचा समावेश केला आहे. कांदा आणि लसणाचे फायदे देखील आहेत. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात.
आयुर्वेदाच्या माहितीनुसार, कांदा आणि लसणाचे सेवन केल्याने प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच आपल्या शरीराचे पचन तंत्र देखील मजबूत होण्यास मदत होते. कांदा कापताना भले आपल्याला रडवत असेल, लसणाचा वास नाकाला सहन होत नसेल. मात्र तुम्ही याचे फायदे वाचले तर तुम्ही रोज त्याचे सेवन करण्यास सुरुवात कराल.
कांदा आणि लसूण खाण्याचे फायदे
रोग प्रतिकारक शक्ती: कांदा आणि लसणाचे सेवन केल्याने आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. यामध्ये अँटी ऑक्साइड्स आणि अँटी बॅक्टेरीयल गुणधर्म आढळून येतात. याच्या सेवनाने तुम्ही अनेक आजारांपासून बचाव करू शकता.
हृदयाच्या आरोग्यासाठी: कांदा आणि लसणाचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी किंवा कंट्रोल केले जाऊन शकते. तसेच शरीरातील ब्लड सर्क्युलेशन नीट होते. तसेच यांच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य देखील सुधारण्यास मदत होते.
सांधेदुखीपासून आराम: कांदा आणि लसणाचे सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. कांदा आणि लसणाच्या पाण्यात अँटी इम्फ्लेन्ट्री गुण आढळून येतात. यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळू शकतो.
पचन तंत्र सुधारते: कांदा आणि लसणाच्या सेवनाने शरीराचे पाचन तंत्र सुधारण्यास मदत होते. जर का तुम्हाला अपचन, गॅस, कफ या समस्यांचा त्रास असेल तर, कांदा आणि लसणाचे सेवन करणे फायदेशीर ठरते.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर: कांदा आणि लसणाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. कांद्यात फायबर असते आणि कॅलरीचे प्रमाण कमी असते. याच्या सेवनाने पोट भरल्यासारखे वाटते. भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते. लसूण खाल्ल्याने मेटॉबॉलिज्म वाढते. तसेच कॅलरी बर्न करण्यास मदत करते.
कशामध्ये मिक्स करून खावे कांदा आणि लसूण?
१. कांदा आणि लसणाची फोडणी पदार्थांची चव वाढते. तसेच ते पौष्टिक देखील असते.
२. थंडीच्या काळात कांदा आणि लसणाची चटणी फायदेशीर ठरते.
३. जेवणासोबत कांद्याचे सलाड हे पचनसंस्थेसाठी चांगले असते.
४. कांदा आणि लसणाचा काढा सर्दी-खोकल्यासाठी रामबाण उपाय आहे.
महत्वाची टीप- वरील लेख हा सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणताही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.