Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ पद्धतीने नियमित करा हळदीचे सेवन! हंसा योगेंद्र यांनी सांगितलेला प्रभावी उपाय, चेहऱ्यासोबतच संपूर्ण शरीर राहील निरोगी

सकाळी उठल्यानंतर नियमित हळदीच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते. जाणून घेऊया हळदीच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीराला होणारे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 14, 2026 | 08:39 AM
'या' पद्धतीने नियमित करा हळदीचे सेवन! हंसा योगेंद्र यांनी सांगितलेला प्रभावी उपाय

'या' पद्धतीने नियमित करा हळदीचे सेवन! हंसा योगेंद्र यांनी सांगितलेला प्रभावी उपाय

Follow Us
Close
Follow Us:

हळदीचे शरीराला होणारे फायदे?
हळदीमध्ये कोणते घटक आढळून येतात?
हाडांच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी उपाय?

भारतीय स्वयंपाक घरात कायमच हळद उपलब्ध असते. हळदीचा वापर जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. जेवणात हळद टाकल्यास पदार्थाचा सुगंध आणि चव वाढते. यासोबतच हळदीच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. हळदीमध्ये असलेले औषधी गुणधर्म शरीरासाठी औषधाप्रमाणे असतात. त्यामुळे जेवण बनवताना आवर्जून हळदीचा वापर करावा. आयुर्वेदामध्ये हळदीला खूप जास्त महत्व आहे. रोजच्या आहारात किंवा महिनाभर हळदीच्या दुधाचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. तब्येत चांगली राहण्यासाठी हळदीचा आहारात समावेश करावा. आज आम्ही तुम्हाला प्रसिद्ध योग गुरू हंसा योगेंद्र यांनी हळदीचे सेवन केल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

शरीरात ही ७ लक्षणे दिसली तर सावध व्हा! डायबिटीज होण्याची अफाट शक्यता

हळदीचे सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे:

हळदीमध्ये असलेले गुणकारी घटक शरीराच्या आतील अवयवांना आलेली सूज कमी करतात आणि आरोग्य सुधारतात. यामध्ये असलेले एंटी इंफ्लेमेटरी गुण सांध्यांच्या वेदना, ऑस्टिओआर्थरायटिसपासून कायमचा आराम मिळवून देतात. बऱ्याचदा जखम झाल्यानंतर किंवा कुठेही पडल्यानंतर मुका मार लागल्यास हळद लावली जाते. यामुळे सूज कमी होते आणि जखम भरण्यास मदत होते. हळदीमध्ये असलेले अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी सेप्टीक घटक जखम भरण्यास मदत करतात. शरीराच्या कोणत्याही अवयवावर झाली जखम लवकर भरून काढण्यासाठी नियमित हळदीच्या दुधाचे सेवन करावे.

मेंदूसाठी फायदेशीर:

मेंदूची स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी हळदीचे सेवन करावे. हळदीतील करक्यूमीन मेंदू कमकुवत होऊ देत नाही. मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हळदीचे आहारात सेवन करावे. मेमरी लॉसचा धोका टाळण्यासाठी नियमित हळद दूध किंवा हळदीचा समावेश असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. यासोबतच शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधरण्यासाठी नियमित हळद दुधाचे सेवन करावे. याशिवाय चांचभर आल्याचा रस घेऊन त्यात हळद आणि काळीमिरी पावडर मिक्स करून प्यायल्यास इम्युनिटी वाढेल.

पालक-कोबीमधील किडे पोटात गेल्यास काय होते? डॉक्टरांनी दिला इशारा, भाजी धुण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

चेहऱ्यावर ग्लो येईल:

हळद शरीरसोबतच त्वचेसाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर आहे. हळदीमध्ये असलेले घटक चेहऱ्यावर आलेले काळे डाग आणि पिंपल्स घालवण्यासाठी मदत करते. त्यामुळे हळद, दूध आणि बेसन मिक्स करून तयार केलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचा खूप जास्त उजळदार होईल. तसेच पोटाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोमट पाण्यात चिमूटभर हळद मिक्स करून प्यावी.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Consume turmeric regularly in this way an effective remedy suggested by hansa yogendra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 08:39 AM

Topics:  

  • Benefits of Turmeric water
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

हात- पाय कायमचं सुन्न पडतात? उतार वयात ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी आवश्यक ठरतात ‘ही’ जीवनसत्वे, वेदनांपासून राहाल कायमच दूर
1

हात- पाय कायमचं सुन्न पडतात? उतार वयात ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी आवश्यक ठरतात ‘ही’ जीवनसत्वे, वेदनांपासून राहाल कायमच दूर

दररोज चावून खा आयुर्वेदिक ओव्याचे पान! आरोग्यासंबंधित गंभीर आजार राहतील दूर, पिढ्यानुपिढ्या केला जाणारा घरगुती उपाय
2

दररोज चावून खा आयुर्वेदिक ओव्याचे पान! आरोग्यासंबंधित गंभीर आजार राहतील दूर, पिढ्यानुपिढ्या केला जाणारा घरगुती उपाय

Turmeric Milk: हिवाळ्यात नियमित करा हळदीच्या दुधाचे सेवन, सांध्यांच्या वेदनांपासून मिळेल कायमच आराम
3

Turmeric Milk: हिवाळ्यात नियमित करा हळदीच्या दुधाचे सेवन, सांध्यांच्या वेदनांपासून मिळेल कायमच आराम

संपूर्ण दिवसभर फ्रेश आणि उत्साही राहण्यासाठी आवर्जून करा ‘या’ पेयांचे सेवन, अपचनाच्या समस्या होतील कायमच्या दूर
4

संपूर्ण दिवसभर फ्रेश आणि उत्साही राहण्यासाठी आवर्जून करा ‘या’ पेयांचे सेवन, अपचनाच्या समस्या होतील कायमच्या दूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.