'या' फळांच्या सेवनामुळे कधीच वाढणार नाही रक्तातील साखर
जगभरात गंभीर आजाराच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ आहे. चुकीचा आहार, पोषक घटकांची कमतरता, अपुरी झोप, शारीरिक हालचालींचा अभाव, गोड पदार्थांचे अतिसेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. जीवनशैलीतील बदलांमुळे मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक गंभीर आजार वाढू लागले आहेत. हल्ली प्रत्येक व्यक्ती मधुमेहाने त्रस्त आहे. मधुमेह झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये शरीरात अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. मात्र कालांतराने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल होण्यास सुरुवात होते. शरीरात होणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष केल्यामुळे मधुमेह आणखीनच वाढू लागतो, ज्यामुळे शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचण्याची जास्त शक्यता असते. मधुमेह झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यामुळे शरीरातील अवयव हळूहळू निकामी होऊन जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या फळांचे सेवन केल्यामुळे रक्तात साखर वाढत नाही, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर जांभूळ उपलब्ध आहेत. जांभुळमध्ये जंबोलिन आणि जंबोसिन नावाचे घटक आढळून येते, ज्यामुळे रक्तातील साखर अजिबात वाढत नाही. इन्सुलिनच्या कार्यक्षमतेत सुधार करण्यासाठी नियमित जांभूळ खावे. जांभूळ किंवा जांभळाच्या पावडरचे सेवन केल्यास रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. जांभळातील अँटिऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारशक्ती कायमच मजबूत ठेवतात.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पेरू खायला खूप आवडतो. पेरूचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. पेरू खाल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पेरू खाल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया निरोगी राहते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यासाठी पेरू अतिशय गुणकारी आहे.
जेवल्यानंतर तुम्हीसुद्धा लगेच अंघोळ करत असाल तर थांबा! जाणून घ्या अंघोळ करण्याची योग्य वेळ
पपई खाल्यामुळे आरोग्याला भरपूर पोषण मिळते. महिलांच्या आरोग्यासाठी पपई अतिशय फायदेशीर आहे. कारण यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर शरीराची पचनक्रिया कायमच निरोगी ठेवतात. मधुमेहाच्या रुग्णांनी कमी कॅलरीज असलेल्या फळांचे सेवन करावे. पपईचे सेवन केल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीराला आलेली सूज कमी होते.
मधुमेह म्हणजे काय?
मधुमेह, ज्याला डायबिटीज मेलिटस देखील म्हणतात, ही एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेची (ग्लुकोज) पातळी सामान्य पेक्षा जास्त असते. हे तेव्हा होते जेव्हा तुमचे शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही किंवा तयार केलेले इन्सुलिन प्रभावीपणे वापरू शकत नाही.
मधुमेहाचे निदान कसे केले जाते?
मधुमेहाचे निदान करण्यासाठी, डॉक्टर रक्तातील साखरेची पातळी तपासतात. यासाठी, खालील चाचण्या केल्या जातात: उपवास रक्तातील साखर चाचणी (Fasting Blood Sugar Test), यावेळी रक्तातील साखर चाचणी (Random Blood Sugar Test), HbA1c चाचणी.
मधुमेहामुळे होणाऱ्या गुंतागुंती काय आहेत?
हृदयविकार.लकवा.डोळ्यांचे आजार (रेटिनोपॅथी).मूत्रपिंडाचे आजार (नेफ्रोपॅथी).पाय आणि हातांना अर्धांगवायू (न्यूरोपॅथी).व्रण