Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थाचे सेवन केल्यास कधीच होणार पित्ताचा त्रास, नसांमध्ये साचलेले खराब कोलेस्ट्रॉल होईल नष्ट

शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी आल्याच्या रसाचे सेवन करावे. यामध्ये असलेल्या गुणकारी घटकांमुळे शरीराला अनेक फायदे होतात. जाणून घ्या आल्याच्या रसाचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 09, 2025 | 05:30 AM
स्वयंपाक घरातील 'या' पदार्थाचे सेवन केल्यास कधीच होणार पित्ताचा त्रास

स्वयंपाक घरातील 'या' पदार्थाचे सेवन केल्यास कधीच होणार पित्ताचा त्रास

Follow Us
Follow Us:

हल्ली हार्ट अटॅक येऊन मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कोणत्याही क्षणी हार्ट अटॅक आल्यानंतर योग्य वेळी उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे धावपळीच्या जीवनातसुद्धा आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. हार्ट अटॅक, कार्डिअक अरेस्ट, ब्लॉकेज इत्यादी गंभीर आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. आहारात कोणत्याही पदार्थांचे सेवन, सतत तिखट किंवा तेलकट पदार्थ खाणे, जंक फूड, व्यायामाचा अभाव इत्यादी अनेक गोष्टींच्या कमतरतेमुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते.हृद्यासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने वेगवेगळ्या गोळ्या औषधांचे सेवन केले जाते. त्यामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्यांपासून कायमच दूर राहण्यासाठी आहारात आल्याचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – istock)

रक्तात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी सकाळी करा ‘या’ लाल रसाचे सेवन, कोलेस्ट्रॉसह- मधुमेह राहील नियंत्रणात

जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना आल्याचा वापर केला जातो. आलं लसूण पेस्ट टाकल्यामुळे पदार्थाची चव आणखीनच वाढते आणि खाल्ले अन्नपदार्थ सहज पचन होतात. दैनंदिन आहारात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम शरीरावर दिसून येतो. त्यामुळे वारंवार चहा कॉफीचे सेवन करण्याऐवजी आल्याच्या रसाचे सेवन करावे. आल्यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते आणि पोट स्वच्छ होत. आज आम्ही तुम्हाला आल्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.

आल्याचे सेवन केल्यामुळे शरीराला होणारे फायदे:

सकाळी झोपेतून उठल्यानंतर उपाशी पोटी आल्याच्या रसाचे सेवन करावे. यासाठी आलं किसून त्यातील रस काढावा आणि त्यात मध मिक्स करून खावे. आल्याचा रस प्यायल्यानंतर काही मिनिटांनी कोमट पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्यासोबतच आतड्यांमधील घाण सुद्धा स्वच्छ होते. ४५ दिवस नियमित सुकलेल्या आल्याची पावडर खाल्ल्यास शरीरात जमा झालेले वाईट कोलेस्ट्रॉल स्वच्छ होण्यास मदत होईल. शरीरसंबंधित उद्भवलेल्या गंभीर समस्या केवळ गोळ्या औषधाने नाहीतर घरगुती उपाय करून सुद्धा बऱ्या होतात.

सूज कमी होते:

हृदयात साचून राहिलेल्या उच्च कोलेस्टरॉलमुळे रक्तवाहिन्या कमकुवत होऊन जातात. कोलेस्टरॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा होतो, ज्याला ‘क्रॉनिक इन्फ्लेमेशन’ असे सुद्धा म्हणतात. यामुळे हृदयाला सूज येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे आल्याचे सेवन केल्यास रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते आणि जिंजरॉल्स आणि शोगॉल्स सूज कमी करण्यास मदत करतात. रक्तवाहिन्यांमधील लवचिकता कायम टिकून राहण्यासाठी आल्याच्या रसाचे सेवन करावे.

आतड्यांमध्ये चिकटलेली घाण होईल क्षणार्धात स्वच्छ! रात्री झोपण्याआधी करा ‘या’ सोनेरी पाण्याचे सेवन, चेहऱ्यावर येईल ग्लो

रक्तात साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी आल्याचा रस प्यायला जातो. याशिवाय शरीरात वाढलेली ऍसिडिटी, अपचन आणि गॅस कमी करण्यासाठी आल्याचा रस प्यावा किंवा आल्याचा बारीक तुकडा चावून खाल्ल्यास शरीराला अनेक फायदे होतील. सकाळच्या चहामध्ये, स्मूदी, रस किंवा हर्बल टी बनवताना तुम्ही आल्याचा वापर करू शकता.

FAQs (संबंधित प्रश्न)

कोलेस्टेरॉल म्हणजे काय?

रक्तात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्यास रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक तयार होतो, ज्यामुळे त्या अरुंद होतात आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता वाढते.

उच्च कोलेस्टेरॉल कमी करण्याचे उपाय:

संतृप्त चरबी (saturated fat) आणि ट्रान्स फॅट्सचे (trans fats) सेवन कमी करा. धावणे, जॉगिंग करणे यासारख्या व्यायामामुळे वजन नियंत्रणात राहते आणि कोलेस्टेरॉल कमी होते. फळे, भाज्या आणि नट्स यांसारख्या विरघळणाऱ्या फायबर (soluble fiber) युक्त पदार्थांचे सेवन वाढवा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Consuming this food from the kitchen will never cause pitta problems home remedies for cholestrol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Cholesterol home Remedy
  • dry ginger water

संबंधित बातम्या

लाल चुटूकदार क्रॅनबेरी आहेत पोषक तत्वांचा पॉवर हाऊस! कॅन्सरपासून ते अगदी गंभीर रक्तवाहिन्यांच्या आजारांपासून मिळेल कायमची सुटका
1

लाल चुटूकदार क्रॅनबेरी आहेत पोषक तत्वांचा पॉवर हाऊस! कॅन्सरपासून ते अगदी गंभीर रक्तवाहिन्यांच्या आजारांपासून मिळेल कायमची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.