
नसांना चिकटलेली चरबी झपाट्याने होईल कमी! 'हे' पदार्थ पाण्यात उकळवून प्यायल्यास महिनाभरात दिसून येतील बदल
Homemade Spice Drink: भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये गंभीर आजारांच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वाढलेले वजन, बदलेली जीवनशैली, कामाचा वाढलेला तणाव, आहारात होणारे बदल, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येतो. हात पाय दुखणे, सांध्यांमध्ये वेदना, सतत थकवा जाणवणे इत्यादी अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. बदललेल्या जीवनशैलीमुळे तरुण वयात सुद्धा वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे वेळीच योग्य ते उपचार घेऊन शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. शरीरात अनावश्यक चरबीचा घेर वाढू लागल्यानंतर वेगवेगळे आजार सुद्धा होऊ शकतात.(फोटो सौजन्य – istock)
खराब कोलेस्ट्रॉल, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी आजारांची लागण झाल्यानंतर आरोग्य बिघडून जाते. पोट, मांड्यावर किंवा शरीरात अनावश्यक चरबी वाढू लागल्यानंतर अनेक वेगवेगळे आजार होतात. त्यामुळे नसांमध्ये चिटकून राहिलेली अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी या पदार्थांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन करावे. महिनाभर नियमित काढा प्यायल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होण्यासोबतच आरोग्य सुधारण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया आयुर्वेदिक काढा बनवण्याची सोपी कृती.
काढा बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात दालचिनी, मोठी वेलची आणि ठेचून घेतलेल्या लवंग घालून पाण्याला उकळी काढा. पाण्याला एक उकळी आल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवा. मसाल्यांचा अर्क पूर्णपणे पाण्यात उतरल्यानंतर गॅस बंद करून पाणी गाळून घ्या. तयार केलेले पाणी नियमित सकाळी उपाशी पोटी किंवा सकाळच्या नाश्त्यात सुद्धा पिऊ शकता. चहा कॉफी पिण्याऐवजी हर्बल आणि आयुर्वेदिक घटकांनी समृद्ध असलेल्या पेयांचे सेवन करावे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. याशिवाय काढ्यात तुम्ही गूळ किंवा मध सुद्धा मिक्स करून पिऊ शकता.
नसा आणि सांधे निरोगी ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे फार आवश्यक आहे. दैनंदिन आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल. जवसाच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड असतात तर चिया सिड्समध्ये लोह, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येते. याशिवाय पचनाच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी बडीशेप चावून खावी. बडीशेप खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते हात-पाय दुखणं, थकवा येणं, मुंग्या येणं आणि शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत.
Ans: रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतींवर कोलेस्टेरॉल, चरबीयुक्त पदार्थ आणि इतर घटक जमा होऊन प्लाक तयार होऊ शकतो. या स्थितीला अॅथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. त्यामुळे रक्तप्रवाह कमी होण्याचा धोका वाढतो.
Ans: कोणताही विशिष्ट पदार्थ पाण्यात उकळवून प्यायल्याने नसांमध्ये जमा झालेला प्लाक महिनाभरात नाहीसा होतो, याचा ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी संतुलित आहार, व्यायाम आणि गरजेनुसार औषधे महत्त्वाची आहेत.
Ans: संतृप्त आणि ट्रान्स फॅटचे जास्त सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, धूम्रपान, आनुवंशिकता आणि काही वैद्यकीय स्थितींमुळे LDL वाढू शकते.