
पायांच्या टाचांना पडलेल्या भेगा कायमच्या होतील नष्ट! १० रुपयांच्या तुरटीचा 'या' पद्धतीने करा वापर
तुरटीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. सतत धावपळीच्या परिणामामुळे आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात वाढलेला थकवा, तणाव कमी करण्यासाठी विश्रांती घेणे आवश्यक आहे. त्वचेवर वाढलेले फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी तुरटी फायदेशीर आहे. तुरटीचा वापर पायांना केल्यास पायांची त्वचा अतिशय सुंदर आणि मुलायम होते. दिवसभर कामात किंवा प्रवासामध्ये उभं राहून पाय थकल्यानंतर गरम पाण्यात तुरटी मिक्स करून पायांना शेक द्यावा. यामुळे पायांच्या वेदनांपासून आराम मिळतो आणि पायांची गुणवत्ता सुधारते.
बूट किंवा मोजे घातल्यामुळे पायांना दुर्गंधी येते. पायांमध्ये वाढलेल्या दुर्गंधीमुळे बऱ्याचदा पायांवरील त्वचा कुजण्याची शक्यता असते. अशावेळी तुरटीच्या पाण्याचा वापर करावा. तुरटीमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म पाय स्वच्छ करतात. याशिवाय सतत येणाऱ्या घामामुळे पायांवरील त्वचा चिकट आणि तेलकट होऊन जाते. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुरटीचा वापर करावा.
शरीराच्या कोणत्याही अवयवावर वाढलेले फंगल इन्फेक्शनवर नियंत्रण ठेवण्यासाठी तुरटीचा वापर करावा. यामध्ये असलेले अँटी-फंगल प्रॉपर्टी पायांवरील अॅथलीट फूट नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. याशिवाय पायांमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी तुरटीचा वापर करावा. पायांना वाढलेली सूज कमी करण्यासाठी अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या तुरटीचा वापर करावा.