डोळ्यांखाली काळी वर्तुळ वाढली आहेत? शरीरात निर्माण झालेल्या 'या' विटामिनच्या कमतरतेमुळे त्वचा होईल निस्तेज
डोळ्यांखाली काळी वर्तुळ येणं ही अतिशय सामान्य समस्या आहे. महिलांसह पुरुषांच्या सुद्धा डोळ्यांवर काळे डाग येतात. डोळ्यांभोवती वाढलेल्या काळ्या वर्तुळांमुळे त्वचा अधिकच निस्तेज आणि म्हाताऱ्यासारखी वाटू लागते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर चेहऱ्यावरील ग्लो कमी होऊन जातो. हवामानात सतत होणाऱ्या बदलांमुळे त्वचा तेलकट, चिकट होऊन जाते. ज्यामुळे चेहऱ्यावर घाण किंवा धूळ जमा होते. ही घाण त्वचेच्या छिद्रांमध्ये साचून राहिल्यामुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स आणि फोड येतात. यासोबतच धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम आरोग्यासोबतच त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. झोपेची कमतरता, स्ट्रेस, वाढता स्क्रीन टाइम इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम त्वचेवर लगेच दिसून येतो. डोळ्यांभोवती वाढलेले काळे डाग घालवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात.
पालकची भाजी खायला आवडत नाही? मग हिरव्यागार पानांपासून घरीच बनवा नॅचरल फेसपॅक,एका दिवसात चमकेल चेहरा
त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर महिला ती सुधरण्यासाठी सतत काहींना काही करत असतात. महागडे स्किन केअर प्रॉडक्ट, सीरम इत्यादी अनेक गोष्टींचा वापर केला जातो. पण तरीसुद्धा त्वचा उठावदार आणि सुंदर दिसत नाही. कायमच महागड्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे डोळ्यांभोवती काळे डाग येतात? दैनंदिन जीवनातील कोणत्या सवयींमध्ये बदल केल्यास त्वचा सुंदर होईल? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
बऱ्याचदा स्किन केअर रुटीन, योग्य आहार, पुरेशी झोप घेऊन सुद्धा डोळ्यांभोवती काळे डाग वाढतात. यासाठी कारणीभूत ठरते शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता. विटामिन बी १२ शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे. या विटामिनच्या कमतरतेमुळे त्वचेचा रंगद्रव्य वाढतो आणि त्वचा खूप जास्त निस्तेज दिसू लागते. त्वचेची गुणवत्ता पूर्णपणे खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. चमकदार चेहऱ्यासाठी कायमच स्किन केअर करण्यापेक्षा त्वचेला आतून पोषण देणे जास्त आवश्यक आहे. विटामिन बी १२ च्या कमतरतेमुळे शरीरातील मेलेनिन संतुलन बिघडते आणि त्वचेच्या रंगामध्ये बदल दिसून येतो.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये सनस्क्रीन लावणे खूप जास्त गरजेचे आहे. सनस्क्रीन लावल्यामुळे त्वचेचे हानिकारक सूर्याच्या किरणांपासून त्वचेचे रक्षण होते आणि चेहरा अधिक उजळदार दिसतो. त्यामुळे जास्त वेळ बाहेर उन्हात फिरू नये. सूर्याची अतिनील किरणे, झोपेचा अभाव, ताणतणाव, हार्मोनल बदल आणि चुकीच्या आहारामुळे त्वचा अतिशय निस्तेज होऊन जाते. त्यामुळे रोजच्या आहारात पालेभाज्या,फळे, भरपूर पाणी आणि दैनंदिन जीवनात योग्य सवयी फॉलो करणे आवश्यक आहे. आहारात अंडी, दूध, मासे, गाजर, पपई, टोमॅटो इत्यादी भाज्यांचे सेवन केल्यास शरीराला योग्य प्रमाणात विटामिन वि १२ मिळेल आणि त्वचा सुंदर होईल.शरीरातील विटामिन अ, क, ई आणि बी १२ मेलेनिन उत्पादन नियंत्रित करण्यास मदत करतात.






