लग्नाआधी त्वचेवरील ग्लो वाढवण्यासाठी करून पहा 'हे' सोपे उपाय
हिंदू धर्मात लग्न सोहळ्याला विशेष महत्व आहे. हा दिवस सर्वच मुलींच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा असतो. तीन ते चार महिने आधीपासून लग्नाची तयारी सुरु केली जाते. लग्नात नेसायच्या साड्या, दागिने, चप्पल इत्यादी अनेक गोष्टींची खरेदी केली जाते. यासोबतच चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी फेशिअल, क्लीनअप, फेसमास्क इत्यादी अनेक गोष्टी केल्या जातात. पण चेहऱ्यावरील ग्लो वरून वाढण्यासोबतच त्वचेची आतून काळजी घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.कारण आहारात होणाऱ्या बदलांचा परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसून येतो. पिंपल्स, मुरूम, बारीक पुरळ इत्यादी त्वचेसंबंधित समस्या उद्भवल्यानंतर त्वचा पूर्णपणे निस्तेज होऊन जाते. त्यामुळे लग्नाआधी त्वचेची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला लग्नाआधी त्वचेची कशी काळजी घ्यावी? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करून चेहऱ्यावर ब्रायडल ग्लो येईल.(फोटो सौजन्य – istock)
लग्नाच्या आधी चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी मुली बाजारात उपलब्ध वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट करतात. हायड्रा फेशिअल, केमिकल पील इत्यादी अनेक ट्रीटमेंट करून घेतात. यामुळे संवेदनशील त्वचेला हानी पोहचते आणि चेहऱ्यावर ग्लो येण्याऐवजी त्वचा आणखीनच निस्तेज होऊन जाते. त्यामुळे लग्नाच्या एक महिना त्वचेची काळजी घेताना घरगुती पदार्थांचा वापर करावा. घरगुती पदार्थाच्या वापरामुळे त्वचा अधिकच सुंदर आणि चमकदार होते. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो.
मोठ्या वाटीमध्ये तांदळाचे पीठ, कोरफड जेल, विटामिन ई कँप्सूल एकत्र मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण जेल सारखे तयार झाल्यानंतर बाटलीमध्ये भरून ठेवा. रात्री झोपण्याआधी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर तयार केलेले जेल हातांवर घेऊन संपूर्ण मान आणि चेहऱ्यावर लावून ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करून रात्रभर तसेच ठेवा. हा उपाय १५ दिवस नियमित केल्यास चेहऱ्यावर वाढलेला टॅन, सुरकुत्या आणि डेड स्किन कमी होण्यास मदत होईल. तसेच त्वचेच्या सर्व समस्यांपासून सुटका मिळेल.
पालकची भाजी खायला आवडत नाही? मग हिरव्यागार पानांपासून घरीच बनवा नॅचरल फेसपॅक,एका दिवसात चमकेल चेहरा
तांदळाच्या पाण्याचा वापर टोनर म्हणून केला जातो. कोरियन स्किन केअर प्रॉडक्टमध्ये तांदळाचे पाणी वापरले जाते. यामध्ये विटामिन बी, ई आणि सी इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे त्वचेवरील नैसर्गिक चमक कायम टिकून राहते. कोरफड जेल त्वचा हायड्रेट करते. त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यासाठी कोरफड जेलचा वापर करावा. यामुळे त्वचेमध्ये वाढलेली जळजळ आणि मुरूम कमी होतात.






