
हजारो पाहुणे, कोट्यवधींचा खर्च, सात जन्मांची बंधने आणि सोशल मीडियावरील ‘परफेक्ट कपल’चे शो-ऑफ… वर्षानुवर्षे चालत आलेली ही पारंपरिक लग्नाची भव्य सिस्टीम सध्या जागतिक पातळीवर आणि भारतातही ‘क्रॅश’ होताना दिसत आहे. या बदलाचा रिमोट कंट्रोल आहे ‘जेन झी’ च्या हातात!
भारतात दरवर्षी साधारण १ कोटींहून अधिक लग्ने होतात आणि हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा उद्योग आहे. मात्र, नव्या पिढीने या सिस्टीमचे नियमच बदलून टाकले आहेत.
‘द बिग फॅट इंडियन वेडिंग‘ला ब्रेक
पूर्वी लग्न म्हणजे कुटुंबाची प्रतिष्ठा मानली जायची. पण जेन झी साठी लग्न म्हणजे केवळ पैशांचा अपव्यय आहे. लोन काढून किंवा पालकांचे आयुष्यभराचे उत्पन्न एका दिवसात उडवण्यापेक्षा, ही पिढी ‘मायक्रो-वेडिंग’ किंवा ‘कोर्ट मॅरेज’ला प्राधान्य देत आहे. तोच पैसा ट्रॅव्हलिंग किंवा भविष्यासाठी इन्व्हेस्ट करण्यावर त्यांचा भर आहे.
लिव्ह-इन आणि ‘सिच्युएशनशिप‘चा प्रभाव
ग्लोबल स्तरावर मॅरेज रेट्स झपाट्याने घसरत आहेत. भारतातही कायदेशीर बंधनांऐवजी लिव्ह-इन रिलेशनशिप किंवा सिच्युएशनशिपचे प्रमाण वाढले आहे. ‘नो कमिटमेंट, नो ड्रामा’ या विचारसरणीमुळे लग्नाची सिस्टीम मागे पडत आहे.
‘माय लाईफ, माय रूल्स‘
नव्या पिढीसाठी ‘स्वातंत्र्य’ आणि ‘करिअर’ सर्वात महत्त्वाचे आहे. लग्न केल्यावर येणारी कौटुंबिक जबाबदारी, तडजोडी आणि स्वातंत्र्यावरील गदा यामुळे तरुण-तरुणी लग्नाचा निर्णय पुढे ढकलत आहेत किंवा थेट नकार देत आहेत. परिणामी, भारतात घटस्फोटांचे आणि विवाहाचे वय दोन्ही वाढत चालले आहे.
जेन झी नवऱ्यांना Independent बायको नको, सर्वेक्षणात धक्कादायक बाब उघड!
ग्लोबल ट्रेंड (DINK): जगभरात सध्या Double Income, No Kids (DINK) ही संकल्पना वेगाने पसरत आहे. लग्न केले तरी मुले नकोत, फक्त पेट्स हवेत, अशी मानसिकता तयार होत आहे.
थोडक्यात सांगायचे तर, लग्न ही संस्था पूर्णपणे संपलेली नाही, पण ती री-बूट होत आहे. जेन झी ला पारंपरिक रितीरिवाजांपेक्षा मानसिक शांतता, आर्थिक स्थैर्य आणि व्यक्तीस्वातंत्र्य जास्त महत्त्वाचे वाटते. जर लग्नसंस्थेने स्वतःमध्ये लवचिकता आणली नाही, तर ही सिस्टीम कायमची ‘हँग’ होण्याचा धोका नाकारता येत नाही.