शेफ कुणाल कपूर स्पेशल रेसिपी! नाश्त्यासाठी बनवा सुपर हेल्दी पालक पनीर डोसा
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. मेथी, पालक, मुळा इत्यादी भाज्या आवडीने खाल्ल्या जातात. पण कायमच हिरव्या पालेभाज्यांची भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी सांगितलेला पालक पनीर डोसा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. पालक खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. पण लहान मुलांसह मोठ्यांना पालक खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी मुलांना पालकपासून वेगवेगळे पदार्थ खाण्यास द्यावेत. पालकमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यास पचनक्रिया निरोगी आणि मजबूत राहील. कुणाल कपूर कायमच काहींना काही नवनवीन रेसिपी सांगत असतात. चला तर जाणून घेऊया पालक पनीर डोसा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
मेंदू तल्लख करेल, हाडेही होतील मजबूत… रोज चमचाभर खा डिंकाचा पाक; नोट करा रेसिपी






