Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Moong Bhaji: संध्याकाळसाठी परफेक्ट स्नॅक्स! बनवा मूग डाळीची खुसखुशीत भजी; वाचा सोपी रेपिसी

Moong Bhaji Recipe: जर तुम्हाला नेहमीच्या कांदा किंवा बटाट्याच्या भजींपेक्षा काहीतरी वेगळे आणि पौष्टिक खायचे असेल, तर मूग डाळीचे भजी हा उत्तम पर्याय आहे. जाणून घ्या सोपी रेसिपी.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 12, 2026 | 09:15 PM
Moong Bhaji: संध्याकाळसाठी परफेक्ट स्नॅक्स! बनवा मूग डाळीची खुसखुशीत भजी; वाचा सोपी रेपिसी
Follow Us
Follow Us:

पावसाळी वातावरण, गरमागरम चहा आणि सोबत कुरकुरीत भजी म्हटले की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. सहसा कांदा किंवा बटाट्याच्या भजींना सर्वाधिक पसंती दिली जाते. मात्र, याच पारंपरिक चवीला एक पौष्टिक आणि स्वादिष्ट पर्याय म्हणून मूग डाळीचे भजी झपाट्याने लोकप्रिय होत आहेत. प्रथिने, फायबर आणि पोषक घटकांनी समृद्ध असलेली मूग डाळ आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. विशेष म्हणजे ही भजी बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊसर लागतात. त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी उत्तम पर्याय ठरू शकते.

Fridge Storage Tips: प्रत्येक वस्तू फ्रिजमध्ये ठेवताय? चुकूनही ठेवू नका ‘या’ गोष्टी; नाहीतर होईल नुकसान

मूग डाळीचे भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • १ कप पिवळी मूग डाळ
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • २ हिरव्या मिरच्या
  • थोडी कोथिंबीर
  • १ चमचा आले-लसूण पेस्ट
  • अर्धा चमचा जिरे
  • चिमूटभर हिंग
  • चवीनुसार मीठ
  • तळण्यासाठी तेल

भजी बनवण्याची सोपी पद्धत

सर्वप्रथम मूग डाळ ३ ते ४ तास भिजवून ठेवा. त्यानंतर पाणी काढून डाळ जाडसर वाटून घ्या. मिश्रण फार पातळ होणार नाही याची काळजी घ्या. वाटलेल्या डाळीत कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आले-लसूण पेस्ट, जिरे, हिंग आणि मीठ घालून सर्व साहित्य चांगले एकजीव करा. यामुळे भजींना उत्कृष्ट चव आणि सुगंध मिळतो. कढईत तेल गरम करून मिश्रणाचे छोटे गोळे सोडा. मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा. त्यामुळे भजी बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ राहतात.

भजी अधिक चविष्ट करण्यासाठी टिप्स

  • मिश्रणात थोडी बारीक चिरलेली पालक किंवा मेथी घालू शकता.
  • तिखटपणा वाढवण्यासाठी लाल तिखट किंवा काळी मिरी वापरा.
  • हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह केल्यास चव आणखी खुलते.
  • गरमागरम चहासोबत ही भजी खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
Oral Health: अनेक दिवसांपासून एकच टूथब्रश वापरता? आरोग्यासाठी ठरू शकतो धोकादायक; जाणून घ्या बदलण्याची योग्य वेळ

Web Title: Crispy moong dal bhaji recipe healthy monsoon snack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • monsoon recipe

संबंधित बातम्या

Thatte Idli Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, यंदा घरी बनवा ‘थट्टे इडली’, अशी आहे रेसिपी
1

Thatte Idli Recipe : सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट, यंदा घरी बनवा ‘थट्टे इडली’, अशी आहे रेसिपी

Food Recipe: रोजच्या डब्यासाठी नेहमीच काय बनवावं सुचत नाही ? मग नक्की ट्राय करा चटपटीत पनीर भुर्जी टोस्ट
2

Food Recipe: रोजच्या डब्यासाठी नेहमीच काय बनवावं सुचत नाही ? मग नक्की ट्राय करा चटपटीत पनीर भुर्जी टोस्ट

Ganeshotsav 2026: नैवेद्याच्या पानातील सोपा पदार्थ! गणपती उत्सवात १० मिनिटांमध्ये बनवा रबडीसारखी घट्टसर शाही साबुदाणा खीर
3

Ganeshotsav 2026: नैवेद्याच्या पानातील सोपा पदार्थ! गणपती उत्सवात १० मिनिटांमध्ये बनवा रबडीसारखी घट्टसर शाही साबुदाणा खीर

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी
4

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.