आता महिनाभर नाही, अनेक महिने चालेल गॅस सिलेंडर! स्वयंपाक करताना फक्त करा 'हे' १ लहान काम
शरीरात नेहमी थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? आहारात समाविष्ट करा ‘हे’ ५ पदार्थ; मॅग्नेशियमची कमी होईल दूर
जेवण बनवताना भांड्यावर झाकण ठेवा
जेवण बनवताना कधीही भांड्यावर किंवा कढईवर झाकण ठेवण्याची सवय लावावी. भांडे झाकल्याने उष्णता बाहेर जाण्याचे प्रमाण कमी होते आणि भाजी लवकर शिजते. यामुळे एकूणच गॅसचा वापर कमी होतो. तुम्ही भात शिजवत असाल किंवा भाजी शिजवत असाल कोणताही पदार्थ तयार करताना त्यावर झाकण ठेवायला विसरु नका. यामुळे महिनाभरात गॅस सिलेंडरची बरीच बचत होईल.
बर्नर क्लिन करा
घाणेरडा किंवा चोक झालेल्या बर्नरमुळे गॅसचा वापर वाढू शकतो. जर बर्नरच्या व्हेंट्समध्ये तेल, मसाले किंवा अन्नाचे कण असतील तर कापडाने ही घाण बाहेर काढून चांगली पुसून घ्या. वेळोवेळी बर्नरला साफ करत रहा. सामान्यपणे फ्लेम निळी आणि स्थिर दिसत असेल तर सर्वकाही ठिक आहे पण या पॅटर्नमध्ये काही बदल दिसून येत असेल तर बर्नरची तपासणी करुन घ्या.
हाय फ्लेमचा वापर टाळा
अनेकांना असं वाटतं की, हाय फ्लेमवर जेवण शिजवल्याने जेवण पटकन तयार होते आणि गॅसची बचत होते. पण खरंतर तस नाही आहे, भाजी, डाळ किंवा भात शिजवताना नेहमी गरजेनुसार गॅसची फ्लेम मंद किंवा मध्यम ठेवावी. जिथे गरज असेल फक्त तिथेच हाय फ्लेमचा वापर करा.
गॅस लिकेजकडे दुर्लक्ष करु नका
जर गॅस सिलेंडर पूर्वीहून जलद गतीने संपत असेल तर यासाठी नेहमी तुमच्या कुकिंग स्किल्स जबाबदार ठरत नाही. गॅस पाईप, रेग्युलेटर किंवा कनेक्शन्समधील गळती हे देखील यामागचे कारण ठरु शकते. पाईपमध्ये छिद्र दिसत असेल, पाईप तुटला असेल किंवा सैल कनेक्शन्स आढळल्यास स्वत: त्याची दुरुस्ती न करता प्रशिक्षित तंत्रज्ञाकडून त्याची तपासणी करा आणि काही समस्या असल्यास ती ठिक करुन घ्या. यासोबतच वापर झाल्यानंतर गॅस सिलेंडरचे स्विच बंद करायला विसरु नका,






